फ्रेंच खुली बॅडमिंटन स्पर्धा: सिंधूचे आव्हान संपुष्टात

हैदराबादच्या २६ वर्षीय सिंधूने पहिला गेम २१-१८ असा जिंकत जागतिक क्रमवारीत १५व्या स्थानावरील ताकाहाशीला सावधगिरीचा इशारा दिला.

भारताची दोन ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यात अपयशी ठरली, शनिवारी तीन गेमपर्यंत रंगलेल्या उपांत्य सामन्यात जपानच्या सयाका ताकाहाशीविरुद्ध पराभव पत्करल्यामुळे तिचे आव्हान संपुष्टात आले.

हैदराबादच्या २६ वर्षीय सिंधूने पहिला गेम २१-१८ असा जिंकत जागतिक क्रमवारीत १५व्या स्थानावरील ताकाहाशीला सावधगिरीचा इशारा दिला. परंतु पुढील दोन गेम सिंधूने १६-२१, १२-२१ असे गमावले. २९ वर्षीय ताकाहाशीविरुद्धच्या या आठव्या लढतीत सिंधूने चौथा पराभव पत्करला.

गेल्या आठवड्यात ओडेन्स येथे झालेल्या डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यात विश्वाविजेत्या सिंधूने पराभव पत्करला होता. टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेनंतर विश्रांती घेणाऱ्या सिंधूची ही पुनरागमनाची दुसरी स्पर्धा होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: French open badminton tournament p v sindhu akp

ताज्या बातम्या