भारताचा माजी डावखुरा फलंदाज आणि लखनौ सुपर जांटट्स संघाचा विद्यमान प्रशिक्षक गौतम गंभीर हा त्याच्या शीघ्रकोपी वृत्तीसाठी ओळखला जातो. त्याच्या या स्वभावामुळे अनेकदा वादाचे प्रसंगही उद्भवले आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये १ मे रोजी झालेल्या एका सामन्यामध्ये गौतम गंभीरच्या याच स्वभावाचं दर्शन अवघ्या क्रिकेट विश्वाला झालं. आणि त्याच्यासमोर होता दुसरा आक्रमक वृत्तीचा फलंदाज विराट कोहली. या दोघांमध्ये भर मैदानातच बाचाबाची झाली. तमाम क्रिकेट चाहत्यांनी त्यांच्यातला हा ‘राडा’ पाहिला. या सगळ्या प्रकरणावर सोशल मीडियावर आणि प्रत्यक्षातही भलीमोठी चर्चा झाल्यानंतर अखेर गौतम गंभीरनं मौन सोडलं आहे.

काय आहे हे भांडण?

१ मे रोजी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात ४३वा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात बंगळुरूने लखनऊचा १८ धावांनी पराभव केला. मात्र, सामन्यानंतर खेळाडू हस्तांदोलन करताना विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यात वाद झाल्याचं व्हिडीओमध्ये दिसून आलं. त्यांच्यातला वाद मिटवण्यासाठी इतर खेळाडू मध्ये पडले. विराटनं बाजूला जाऊन चाहत्यांना आणखी मोठ्याने जल्लोष करण्याचे हावभाव केले. थोड्या वेळाने विराटशी चर्चा करणाऱ्या मेयर्सला गंभीर बाजूला घेऊन गेला. तेव्हाच विराटनं गंभीरला पुन्हा डिवचलं आणि गंभीरनंही तितक्याच आक्रमकपणे प्रत्युत्तर दिलं.

vishal Patil
“काँग्रेस पक्ष माझ्यावर कारवाई करू शकेल असं वाटत नाही, कारण…”, विशाल पाटलांना विश्वास
salman khan firing accused Sagar pal father reaction
सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या आरोपीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “तो खूप…”
Virat Kohli's video goes viral
IPL 2024: गौतम गंभीरच्या गळाभेटीवर विराटने सोडले मौन; चाहत्यांना म्हणाला, ‘तुमचा मसाला संपला म्हणून तुम्ही…’, पाहा VIDEO
IPL, GT vs PBKS Preity Zinta Post For Shashank Singh
“IPL लिलावाच्या वेळी झालेल्या चुकीच्या..”, शशांक सिंगबाबत वादावर प्रीती झिंटाने सोडलं मौन, म्हणाली, “आजचाच..”

या वादानंतर पुन्हा इतर खेळाडूंनी मध्ये पडून भांडण सोडवलं. पण तिथून बाजूला झालेल्या विराटला नवीन उल हकनं पुन्हा डिवचलं आणि त्यांच्यात पुन्हा वाद सुरू झाला. यानंतर फाफ डु प्लेसिसनं विराटला शांत करण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. नेटिझन्स आणि क्रिकेट प्रेमींमध्ये मोठी चर्चा घडून आली. पण गौतम गंभीरनं अद्याप त्यावर सविस्तर भूमिका मांडली नव्हती. अखेर न्यूज १८ मध्य प्रदेशच्या एका शोमध्ये बोलताना गौतम गंभीरनं त्या वादावर भूमिका स्पष्ट केली आहे.

काय म्हणाला गौतम गंभीर?

“क्रिकेटच्या मैदानात माझी अनेकदा भांडणं झाली आहेत. पण मी नेहमीच त्या भांडणाला क्रिकेटच्या मैदानापर्यंतच मर्यादित ठेवलं आहे. दोन व्यक्तींमध्ये वाद झाला तर तो क्रिकेटच्या मैदानापर्यंतच मर्यादित राहिला पाहिजे. त्याच्या बाहेर जायला नको. अनेक लोकांनी खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या. पण दोन व्यक्तींमध्ये घडलेल्या गोष्टीवर स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. तो प्रकार क्रिकेटच्या मैदानावर झालाय. मैदानाच्या बाहेर नाही घडला. जर तसं झालं असतं, तर तुम्ही त्याला भांडण म्हणता. दोन व्यक्तींना आपल्या संघासाठी विजय हवा असतो. दोघांना तसा अधिकार आहे”, असं गंभीर म्हणाला.

“…तर मी नवीन उल हकचं समर्थन कधीच केलं नसतं”

“मी जे केलं, त्याचं मी समर्थन करतो. कारण मी त्या व्यक्तीसाठी ते केलं होतं. त्या सामन्यात ती व्यक्ती बरोबर होती. मला जर वाटतंय की नवीन उल हकनं काहीही चुकीचं केलं नव्हतं, तर मग माझं कर्तव्य होतं की मी त्याच्याबरोबर उभं राहावं. मी ते शेवटच्या क्षणापर्यंत करेन. जर मला वाटतंय की कुणी बरोबर आहे, तर मी त्या व्यक्तीबरोबरच उभा राहीन. हेच मला शिकवण्यात आलं आहे. मी हेच नेहमी करेन. मी माझं आयुष्य असंच जगतो. अनेक लोक म्हणाले की मी नवीन उल हकला पाठिंबा देतोय, आपल्या खेळाडूला पाठिंबा देत नाही. पण तिथे कुणी माझा किंवा दुसऱ्याचा खेळाडू नव्हता. जर माझ्या संघाचा खेळाडू चुकला असता, तर मी त्याच्याबरोबर कधीच उभा राहिलो नसतो”, अशी ठाम भूमिका गंभीरनं मांडली.

…म्हणून विराट कोहली अन् गौतम गंभीर यांच्यात झालं भांडण, मैदानातील संपूर्ण Video आला समोर

विराट कोहली-गौतम गंभीरचं नातं काय?

“मी माझी नाती उघड करत नाही. हा प्रश्न मला धोनीबद्दलही विचारला जातो. माझं जे नातं धोनीबरोबर आहे, तेच विराट कोहलीशी आहे. माझे कुणाशी वैयक्तिक वाद नाहीत. वाद फक्त मैदानातला आहे. त्यांनाही जिंकायचंय, मलाही जिंकायचंय. तो वाद मैदानातच राहायला हवा. मी ज्यांच्यासोबत खेळलोय, त्या सगळ्या खेळाडूंचा मी आदर करतो. मग तो एक सामना असो किंवा १०० सामने असोत. कारण आपल्या देशासाठी एक सामना खेळण्यासाठीही किती मेहनत लागते हे मला माहिती आहे.जेव्हा तुम्ही १४० कोटी देशवासीयांचं प्रतिनिधित्व करता, तेव्हा त्या खेळाडूचा आदर करणं आवश्यक आहे”, असंही गंभीर यावेळी म्हणाला.