गेल्या नऊ वर्षांपासून सुरू असलेला भारतीय क्रिकेट संघाचाबाद फेरीचा अडथळा पार करण्याचा प्रयत्न गुरुवारी पुन्हा एकदा अपुराच पडला. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोनही प्रमुख आघाड्यांवर केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळे भारताचे दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक पटकावण्याचे स्वप्न अधुरेच राहिले. अ‍ॅलेक्स हेल्स आणि जोस बटलर यांनी साकारलेल्या उत्कृष्ट अर्धशतकांच्या बळावर इंग्लंडने उपांत्य फेरीत भारताचा १० गडी राखून पराभव केला. यासह भारत-पाकिस्तान अंतिम सामन्याच्याही आशा संपुष्टात आल्या आहेत. या पराभवानंतर भारतीय संघावर टीका केली जात असतानाच भारताचा माजी सलामीवीर आणि २०११ च्या एकदिवसीय विश्वचषक विजेत्या संघातील प्रमुख खेळाडू राहिलेल्या गौतम गंभीरनेही या पराभवानंतर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

नक्की वाचा >> World Cup Final आणि कर्म! पाकिस्तानच्या पराभवानंतर रोहित, विराटची टींगल करण्यावरुन शाहीन आफ्रिदीला भारतीयांनी झापलं

ipl 2024 dhruv jurel salute his father ekana stadium wins heart sanju samson rr vs lsg
PHOTO : मुलगा धुव्र जुरेलची प्रत्यक्ष खेळी पाहून गर्वाने फुलली सैनिक वडिलांची छाती; मुलाचीही अर्धशतकाद्वारे वडिलांना सलामी!
What Bacchu Kadu Said?
अमरावतीतल्या मैदान राड्यानंतर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मला अटक व्हावी म्हणून राणा दाम्पत्याने…”
A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची स्थिती कात्रीत अडकल्यासारखी

भारताचा दारुण पराभव झाल्यानंतर सर्वच स्तरामधून भारतीय संघावर टीकेची झोड उठलेली असतानाच गंभीरनेही यासंदर्भात प्रतिक्रिया नोंदवली आहे. सामन्यपणे आपल्या विधानांमुळे कायमच चर्चेत असणाऱ्या गंभीरने केलेल्या पोस्टकडे दोन्ही अर्थांनी पाहिलं जात आहे. गंभीरने भारताचा पराभव झाल्यानंतर अगदी मोजक्या शब्दांमध्ये ट्वीटरवरुन आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. गंभीरने हे ट्वीट सामना संपल्यानंतर जवळजवळ आठ तासांनी केलं आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार मध्यरात्रीनंतर १२ वाजून १७ मिनिटांनी गंभीरने हे ट्वीट केलं आहे. या ट्वीटला अडीच हजारांहून अधिक रिट्वीट मिळाले आहेत. तर ५८ हजार लोकांनी ते लाइक केलं आहे.

नक्की वाचा : Team India: यापुढे विराट, रोहितला टी-२० संघात स्थान नाही? BCCI च्या सूत्रांची माहिती; म्हणाले, “बीसीसीआयने कधीच…”

गंभीरने या ट्वीटमध्ये भारतीय झेंड्यांचे तीन इमोजी वापले आहेत. “तुम्ही केवळ त्यांच्याकडूनच अपेक्षा ठेऊ शकता ज्यांच्याकडे त्या पूर्ण करण्याची क्षमता असते. मान अभिमानाने उंच ठेवा,” असं गंभीरने म्हटलं आहे. मात्र त्याने हे ट्वीट आताच्या संघासाठी केलं आहे की आधीच्या संघांसाठी केलं आहे यावरुन चाहत्यांमध्ये संभ्रम आहे. या ट्वीटमध्ये गंभीरने ना भारत विरुद्ध इंग्लंड सामन्याचा संदर्भ दिलाय ना कोणताही हॅशटॅग वापरलाय. त्यामुळेच हे ट्वीट त्याने पाठिंबा देण्यासाठी केलं आहे की खोचक टोमणा मारला आहे यावरुन चाहतेच संभ्रमात आहेत. गंभीरची पोस्ट सध्याच्या भारतीय संघांच्या समर्थनार्थ आहे की खोचक पद्धतीने लिहिली आहे याबद्दल कमेंट्स सेक्शनमध्ये चर्चा सुरु असल्याचं दिसून येत आहे.

नक्की वाचा >> England Win World Cup: ऋषी सुनक असा साजरा करणार पाकिस्तानविरोधातील विजय; भारतीय खेळाडूने पोस्ट केलेला Video Viral

अ‍ॅडलेड ओव्हलच्या संथ खेळपट्टीवर भारतीय संघ सुरुवातीला अडचणीत सापडला होता. मात्र, हार्दिक पंड्याने (३३ चेंडूंत ६८ धावा) अखेरच्या षटकांत केलेल्या फटकेबाजीमुळे भारताला प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १६८ धावांची मजल मारता आली. मात्र, हेल्स आणि बटलर या सलामीवीरांनी हे आव्हान १६ षटकांतच पार करत इंग्लंडला अंतिम फेरीत पोहोचवले. हेल्सने ४७ चेंडूंत चार चौकार आणि सात षटकारांसह नाबाद ८६ धावांची, तर कर्णधार बटलरने ४९ चेंडूंत नऊ चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद ८० धावांची खेळी साकारली. भारताचे सर्वच गोलंदाज सपशेल अपयशी ठरले.

नक्की वाचा >> T20 World Cup Final: …म्हणून इंग्लंडच्या संघातील खेळाडू दंडावर काळी पट्टी बांधून पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरले

इंग्लंडच्या गोलंदाजांनी सुरुवातीच्या षटकांत स्विंगचा चांगला वापर केला होता. त्यानंतर मधल्या आणि अखेरच्या षटकांत संथ चेंडूंचे (स्लोअर वन) उत्तम मिश्रण केले. फिरकीपटूंनी अचूक मारा केला. भारतीय गोलंदाज मात्र यात कमी पडले. भुवनेश्वर कुमारच्या पहिल्याच षटकात बटलरने तीन चौकार मारत आपले इरादे स्पष्ट केले. त्यानंतर हेल्सनेही आक्रमकता दाखवली. त्यामुळे पॉवरप्लेच्या सहा षटकांतच इंग्लंडची बिनबाद ६३ अशी धावसंख्या होती. खेळपट्टीकडून फिरकीपटूंना मदत मिळत होती. मात्र, रविचंद्रन अश्विन (२ षटकांत २७ धावा) आणि अक्षर पटेल (४ षटकांत ३० धावा) यांना प्रभाव पाडता आला नाही. याचा फायदा घेत बटलर आणि हेल्स जोडीने इंग्लंडला विजय मिळवून दिला.