PAK vs ENG T20 World Cup Final: टी-२० विश्वचषक २०२२ मधील पहिला उपांत्य फेरीचा सामना दमदार खेळीसह पार करून पाकिस्तान संघ अंतिम फेरीत दाखल झाला होता, यापाठोपाठ अनेकांना भारतही आरामात इंग्लंडला हरवून पाकिस्तानसह अंतिम फेरीत दाखल होईल असे वाटत होते. भारत व पाकिस्तानच नव्हे तर जगभरातील क्रिकेटप्रेमींची आयसीसी टी २० विश्वचषकात कट्टर प्रतिस्पर्धी म्हणजेच भारत विरुद्ध पाकिस्तान सामना व्हावा अशी इच्छा होती. दुर्दैवाने या सर्व इच्छा व प्रार्थना भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात कामी आल्याच नाहीत व इंग्लंडने १० गडी राखून टीम इंडियाचा पराभव केला. संपूर्ण विश्वचषकात सर्वात यशस्वी ठरलेल्या रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला आयत्या वेळी आपली जादू दाखवताच आली नाही. आता टी २० विश्वचषकात अंतिम फेरीत पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड अशी लढत पाहायला मिळणार आहे.

पाकिस्तानचा संघ इंग्लंडशी १३ नोव्हेंबरला मेंबरं क्रिकेट मैदानात आमने सामने येईल. त्यापूर्वी सोशल मीडियावर मात्र पाक खेळाडूंची अनेक विधाने चर्चेत आहेत. पाकिस्तानी गोलंदाज शाहीन आफ्रिदीने तर एका मुलखातीत इंग्लंडच्या फलंदाजांना माझ्यासमोर टिकून दाखवा असं आव्हानही दिलं आहे. तर दुसरीकडे शादाब खान याचेही एक महत्त्वाचे विधान अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.

Who is fast bowler Sandeep Sharma
IPL 2024 : पाच सामन्यांनंतर परतला आणि मुंबई इंडियन्सच्या डावाला खिंडार पाडणारा संदीप शर्मा कोण?
Rohit Sharma Unwanted Record In IPL 2024
MI vs CSK : रोहित शर्माच्या नावावर झाली नकोशा विक्रमाची नोंद, ‘या’ बाबतीत ठरला तिसरा खेळाडू
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव
Mohammad Amir and Imad Wasim Returns to Pakistan National Team
फिक्सिंग, बंदी आणि निवृत्तीनंतर मोहम्मद आमिर पुन्हा पाकिस्तानच्या टी-२० संघात

Video: IPL चे पैसे कमी करा मग भूक काय असते…; वसीम अक्रम यांची टीम इंडियाच्या गोलंदाजांवर सडसडून टीका

स्काय स्पोर्ट्सशी संवाद साधताना नासिर हुसेन यांनी शादाब खानला इंग्लंडविरुद्ध लढण्याचं प्रेशर जाणवत आहे का असा प्रश्न केला असता त्यावर शादाबने दिलेले उत्तर खास ठरते. शादाब म्हणाला की, आम्हाला लहानपणापासून एवढंच शिकवलं जातं की, विश्वचषक जिंका अथवा जिंकू नका पण भारताला हरवायचं आहे, त्यामुळे अशा प्रकारच्या प्रेशरची आम्हाला सवय आहे.

टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूंचे लाड थांबवा, नाहीतर पैसे..; सुनील गावस्कर यांचा BCCI ला कठोर भाषेत सल्ला

दरम्यान, टी २० विश्वचषकाच्या न्यूझीलंड विरुद्ध सामन्यात पाकिस्तानने बाबर-रिझवानच्या अर्धशतकाच्या जोरावर ७ विकेट्सने विजय मिळवला होता. टी-२० विश्वचषक २०२२ च्या अंतिम फेरीत पोहचणारा पहिला संघ ठरला. या सामन्यात न्यूझीलंड प्रथम खेळताना न्यूझीलंड संघान १५३ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाने १९.१ षटकांत ३ गडी गमावून हे लक्ष्य पूर्ण केले होते. शादाब खान याने झिम्बाम्बावे विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यात आपल्या कमाल फलंदाजीने संघाची धुरा सांभाळली होती.