भारतीय संघ उद्या पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्याने आपल्या टी-२० विश्वचषक मोहीमेला सुरुवात करणार आहे. हा सामना मेलबर्न येथे होणार आहे. तत्पुर्वी या सामन्याबद्धल आणि टी-२० विश्वचषक २०२२ बद्धल आपले अंदाज वर्तवत आहे. यामध्ये माजी खेळाडू रॉबिन उथप्पाने देखील झाला आहे. त्याने भारतीय संघाबाबत बोलताना धक्कादायक भविष्यवाणी केली आहे.

२००७ मध्ये धोनीच्या नेतृत्वाखालील टी-२० विश्वचषक विजेत्या संघाचा भाग असलेल्या, रॉबिनने सध्याच्या भारतीय संघाला ऑस्ट्रेलियातील टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणाऱ्या चार संघांच्या यादीतून वगळले. यूएईमध्ये खेळल्या गेलेल्या मागील विश्वचषकाप्रमाणेच या वेळीही भारतीय संघ ग्रुप स्टेजमधून बाहेर पडेल आणि विजेतेपदाची प्रतीक्षा थोडी लांबेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

ईएसपीएन क्रिकइंफोवर बोलताना, ३६ उथप्पाने सांगितले की पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका सुपर १२ टप्प्यातील गट २ मधून अंतिम चारमध्ये प्रवेश करतील. “मला डिस्क्लेमरने सुरुवात करायची आहे. मला वाटत नाही की भारतीय चाहत्यांना फार आनंद होईल. पण माझे उपांत्य फेरीचे संघ ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका असतील,” असे उथप्पा म्हणाला.

हेही वाचा – T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात ग्लेन फिलिप्सने हवेत सूर मारत घेतला अप्रतिम झेल, पाहा व्हिडिओ

रॉबिन उथप्पाची भविष्यवाणी मात्र अनेक तज्ञांना आश्चर्यचकित करणारे ठरले. कारण पॅनेलमधील इतरांनी भारताला अंतिम चारमध्ये स्थान दिले होते. पॅनेलच्या इतर सदस्यांमध्ये अनिल कुंबळे, सॅम बिलिंग्ज, फाफ डू प्लेसिस, स्टीफन फ्लेमिंग, टॉम मूडी, परवेझ मारूफ आणि डॅरेन गंगा यांचा समावेश होता. या दिग्गजांच्या यादीत भारत, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि इंग्लंडचे संघांचा समावेश होता.