टी-२० विश्वचषक जिंकण्याचं भारतीय संघाचं स्वप्न धुळीस मिळालं आहे. इंग्लंडने उपांत्य फेरीमध्ये भारताचा १० गडी राखून पराभूत केल्याने रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ या स्पर्धेतून बाहेर पडला. इंग्लंडने केलेल्या लाजिरवाण्या पराभवामध्ये भारताने दिलेलं १६९ धावांचं आव्हान अत्यंत सहजपणे पार केलं. भारत स्पर्धेतून बाहेर पडल्याने आता उद्या (१३ नोव्हेंबर) सामन्यात इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान असा अंतिम सामना होणार आहे. दरम्यान भारताचा दारुण पराभव झाल्यानंतर संघाला ट्रोल केलं जात असताना पाकिस्तानच्या पंतप्रधानांनीही टोला लगावल्याचं पहायला मिळालं. मात्र या खोचक टोल्याला भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणने जशास तसं उत्तर दिलं आहे.

नक्की वाचा >> World Cup: भारताच्या पराभवानंतर रात्री सव्वाबाराला गौतम गंभीरची संभ्रमात टाकणारी पोस्ट; म्हणाला, “तुम्ही केवळ…”

Zakia Wardak resigns, Zakia Wardak,
अफगाणिस्तानच्या दूतावास अधिकारी झाकिया वारदक यांचा राजीनामा
Pakistani groom gives his bride a photo of former Prime Minister
पाकिस्तानी पतीने लग्नात का गिफ्ट केला माजी पंतप्रधान इम्रान खानचा ‘तो’ फोटो? नवऱ्याच्या चेहऱ्यावरचा एकच भाव होता की…
Sarabjit singh pakistan prisoner
बावीस वर्षे पाकिस्तान तुरुंगात हालअपेष्टा सोसलेल्या सरबजित सिंग यांच्या मारेकर्‍याची हत्या; नेमके हे प्रकरण काय होते?
nashik pakistan zindabad slogans marathi news
उपनगर पोलीस ठाण्याबाहेर जमावाकडून पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, भाजप आमदार देवयानी फरांदे यांची तक्रार

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ट्विट केलं असून भारताच्या लाजिरवाण्या पराभवावर अप्रत्यक्षपणे उपहासात्मक टीका केली आहे. “या रविवारी १५२/० विरुद्ध १७०/० असा सामना होणार आहे,” असं ट्वीट त्यांनी केलं आहे. इंग्लंडने ज्याप्रमाणे भारताचा पराभव केला तसाच पराभव यापूर्वीच्या विश्वचषक स्पर्धेमध्ये पाकिस्तानच्या संघाने भारताचा केला होता.

नक्की वाचा >> Ind vs Eng: भारताचा दारुण पराभव! स्कोअरकार्ड पोस्ट करत शोएब अख्तर म्हणाला, “बिनबाद १७०… हा आकडा पुढील बराच काळ…”

१० गडी राखून भारतावर पाकिस्तानने विजय मिळवला होता त्यावेळी पाकिस्तानचे सलामीवीर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी शानदार फलंदाजी केली होती. या सामन्यात पाकिस्तानने बिनबाद १५२ धावा करत सामना १० गडी राखून जिंकला होता. त्याच पार्श्वभूमीवर शरीफ यांनी रविवारी भारताला १५२/० असं पराभूत करणारे म्हणजेच पाकिस्तान विरुद्ध १७०/० असं पराभूत करणारे म्हणजेच इंग्लंडच्या संघांदरम्यान सामना होणार असल्याचं ट्वीट केलं होतं.

नक्की वाचा : Team India: यापुढे विराट, रोहितला टी-२० संघात स्थान नाही? BCCI च्या सूत्रांची माहिती; म्हणाले, “बीसीसीआयने कधीच…”

मात्र या ट्वीटला आता इरफान पठाणने ट्वीटरवरुन उत्तर दिलं आहे. “तुमच्यात आणि आमच्यात हाच फरक आहे. आम्ही आमच्या सुखांमुळे आनंदी असतो आणि तुम्ही दुसऱ्यांच्या त्रासामुळे. त्यामुळेच तुमचं स्वत:च्या देशाला अधिक चांगलं करण्यासाठी दूर्लक्ष होत आहे,” असा टोला पठाणने लगावला आहे.

नक्की वाचा >> World Cup: भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानी पत्रकाराने मर्यादा सोडली; मोदींचा Video शेअर करत म्हणाला, “पंतप्रधानांनी…”

नक्की वाचा >> Ind vs Eng: २८ चेंडूंमध्ये २७ धावा! ‘टी-२० मध्ये कसोटी खेळणाऱ्या रोहितचं अभिनंदन’; ‘हिटमॅन’च टार्गेटवर, चाहत्यांना संताप अनावर

इरफानचं हे ट्वीट सहा हजारांहून अधिक वेळा शेअर करण्यात आलं आहे. दरम्यान, वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. यानंतर दोन्ही देशातील क्रिकेट चाहते पुन्हा एकदा अंतिम सामन्यात भारत-पाकिस्तान लढत होईल अशी आशा व्यक्त करत होते. पण इंग्लंड संघाने भारताचा दणदणतीत पराभव करत आव्हान संपुष्टात आणलं.