भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजानं तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात तुफानी अर्धशतकी खेळी केली. जाडेजानं तिसऱ्या सामन्यात ५० चेंडूत ६६ धावांची तुफानी फलंदाजी केली. सुरुवातीला संयमी फलंदाजी करताना लागोपाठ तीन चौकार लगावत जाडेजानं आपलं अर्धशतक पूर्ण केलं. दमदार अर्धशतक झळकावल्यानंतर जाडेजानं आपल्या खास शैलीमध्ये या अर्धशतकाचा आनंद साजरा केला.

लागोपाठ तीन चौकार लगावत अर्धशतक पूर्ण करणाऱ्या जाडेजानं तलवारबाजी करत आपल्या खास शैलीत सेलिब्रेशन केलं. सुरुवातील संयमी फलंदाजी करत हार्दिकला साथ दिली. त्यानंतर अखेरच्या काही षटकांमध्ये तुफानी फलंदाजी केली. अखेरच्या सात चेंडूत जाडेजानं ३० धावा चोपल्या. जाडेजानं अर्धशतकी खेळी केल्यानंतर बॅटनं तलवारबाजी केली. हा व्हिडीओ क्रिकेट ऑस्ट्रेलियानं आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे.

आणखी वाचा- Video : दणक्यात पदार्पण करणारा नटराजन सोशल मीडियावर ठरतोय चर्चेचा विषय

४६ व्या षटकांपर्यंत जाडेजानं ३६ चेंडूत संयमी २६ धावांची खेळी केली होती. अखेरच्या चार षटकांत जाडेजानं तुफानी फलंदाजी केली. जोश हेजलवूडच्या एका षटकांत जाडेजानं दोन षटकार लगावले. त्यानंतर सीन एबटच्या षटकात तीन चौकार आणि एक षटकार लगावला. जाडेजानं ५० चेंडूत ६६ धावांची तुफानी फलंदाजी केली.

जाडेजा आणि पांड्यानं सहाव्या गड्यासाठी नाबाद १५० धावांची भागिदारी केली. या जोडगोळीच्या बळावर भारतानं निर्धारित ५० षटकांत ३०२ धावांपर्यंत मजल मारली.