Steve Smith bringing a chair to the field to sit because he was suffering from heat: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील शेवटचा सामना राजकोटमध्ये खेळला जात आहे. आज इथे भरपूर उष्णता आहे. अशा परिस्थितीत पहिल्या डावात मधल्या मैदानावर काही विचित्र घटना पाहायला मिळाली. प्रखर सूर्यप्रकाशामुळे ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ फलंदाजी करताना खूप थकला होता. अशा स्थितीत सामन्यादरम्यान काही वेळासाठी त्याला बसायला मैदानावर खुर्ची आणण्यात आली होते. त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

सामन्यादरम्यान स्मिथला बसण्यासाठी मागवली खुर्ची –

सामन्यादरम्यान स्टीव्ह स्मिथ इतका थकलेला दिसत होता की त्याच्यासाठी खुर्ची मागवण्यात आली. ओव्हरच्या ब्रेकच्या दरम्यान त्याला खुर्चीवर बसवले गेले आणि त्याच्या डोक्यावर बर्फाचा एक ब्लॉक ठेवण्यात आला. अशा स्थितीत त्याला मोठा दिलासा मिळाला असेल. यावेळी स्मिथला खुर्चीवर बसलेले पाहून विराट कोहली त्याच्यापर्यंत पोहोचला आणि खेळाडूंशी बोलू लागला. त्यानंतर तो मजेशीर हावभाव करताना दिसला.

स्टीव्ह स्मिथने खेळली ७४ धावांची खेळी –

भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाने शानदार सुरुवात केली. स्टीव्ह स्मिथने या सामन्यात चांगली खेळी केली आहे. त्याने अवघ्या ६१ चेंडूत ७४ धावांची खेळी केली. स्मिथच्या खेळीत ८ चौकार आणि १ षटकारही समाविष्ट होता. स्मिथ हळुहळू त्याच्या शतकाकडे वाटचाल करत होता, पण नंतर मोहम्मद सिराजने तंबूत पाठवले. सिराजच्या चेंडूवर स्मिथ एलबीडब्ल्यू झाला. आपल्या अर्धशतकाचे तो शतकात रूपांतर करेल असे वाटत होते, पण तो सिराजच्या जाळ्यात अडकला आणि बाद झाला.

हेही वाचा – IND vs AUS 3rd ODI: स्टीव्ह स्मिथने २० धावा करताच गाठला मोठा टप्पा, वॉर्नर आणि फिंचच्या खास क्लबमध्ये झाला सामील

स्मिथ सर्वात जलद ५००० धावा करणारा ठरला चौथा ऑस्ट्रेलियन खेळाडू –

वास्तविक, स्टीव्ह स्मिथने राजकोट वनडेमध्ये ५००० वनडे धावा पूर्ण केल्या आहेत. स्टीव्ह स्मिथ ५ हजार धावा पूर्ण करणारा १७वा ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरला आहे. तसेच, सर्वात जलद ५ हजार करणारा तो चौथा ऑस्ट्रेलियन बनला आहे. त्याने १२९ एकदिवसीय डावात हा पराक्रम केला. स्मिथच्या आधी डीन जोन्सने १२८ डावांत ५ हजार धावा पूर्ण केल्या होत्या. सर्वात जलद पाच हजार धावा पूर्ण करणारा ऑस्ट्रेलियन फलंदाज डेव्हिड वॉर्नर आहे. त्याने ११५ डावात ही कामगिरी केली. अॅरॉन फिंचने १२६ डावात ही कामगिरी केली.