भारतीय संघाचा हिटमॅन रोहित शर्मा सध्या चर्चेत आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर दाखल झाला असून २७ नोव्हेंबरपासून वन डे मालिकेला सुरूवातदेखील होणार आहे. रोहितला मात्र वन डे आणि टी२० मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्याला कसोटी संघाच्या चमूत मात्र जागा देण्यात आली आहे. पण असे असले तरी रोहित शर्मा आणि इशांत हे दोघेही पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रोहित IPLच्या अंतिम सामन्यात फिट असल्याचे दिसूनही रोहित भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला नाही. यामुळे बरेच तर्कवितर्क लढवण्यात येत असतानाच रोहितच्या घरातील एका जवळच्या व्यक्तीला करोना संसर्ग झाला असल्याचे उघड झाले आहे.

Video: मुंबईत सचिन तेंडुलकर रस्ता चुकल्यावर जेव्हा रिक्षाचालक सांगतो, “मला फॉलो करा…”

रोहितला वन डे आणि टी२० संघातून वगळण्याचा निर्णय त्याच्याशी चर्चा करूनच घेण्या आला होता असं BCCI आणि निवड समितीने स्पष्ट केलं होतं. पण यात अंतर्गत राजकारण सुरू असल्याचा संशय चाहत्यांकडून व्यक्त केला जात होता. अशा परिस्थितीत क्रिकेट क्षेत्रातील पत्रकार बोरिया मजुमदार यांनी एक धक्कादायक माहिती दिल्याचं स्पोर्ट्स टूडेने म्हटलं आहे. “रोहित टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलियाला रवाना झाला नाही याचं कारण रोहितच्या वडिलांना करोनाचा संसर्ग झाला होता. हे रोहितच्या ऑस्ट्रेलियाला न जाण्यामागचं खरं कारण आहे”, असे मजुमदार म्हटल्याचे वृत्त स्पोर्ट्स टूडेने दिलं. मात्र, सध्या रोहितचे वडिला करोनामुक्त झाले आहेत का? त्यांना नक्की कधी करोनाची लागण झाली होती? या मुद्द्यावर माहिती मिळालेली नाही.

VIDEO : चहलच्या होणाऱ्या पत्नीचा अनुष्का शर्माच्या ‘क्युटी पाय’ गाण्यावर भन्नाट डान्स

“रोहितच्या वडिलांना करोनाची लागण झाली होती. त्यामुळे तो मुंबईला परतला. पण त्यानंतर जर त्याला ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी क्रिकेट मालिका खेळायची नव्हती, तर तो बंगळुरूच्या राष्ट्रीय प्रशिक्षण अकादमीमध्ये का गेला याचं कारण समजणं कठीण आहे. तो खरं तर पत्नी रितीका आणि मुलीसोबत मुंबईतच राहू शकला असता. त्यामुळे रोहितला स्वत:च कसोटी मालिका खेळण्यात रस नाही असं म्हणणं अतिशय चुकीचं ठरेल”, असेही मजुमदार म्हणाले.