श्रीलंकेविरुद्ध टी-२० मालिका जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या नजरा आता कसोटी मालिकाविजयावर आहेत. त्यासाठी कसोटी संघानेही तयारी सुरू केली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतून बाहेर पडलेल्या भारतीय खेळाडूंनी रविवारी मोहालीच्या आयएस बिंद्रा स्टेडियममध्ये सराव सुरू केला. ४ मार्च रोजी भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिली कसोटी या स्टेडियमवर खेळवली जाणार आहे.

माजी कर्णधार विराट कोहलीसह ऋषभ पंत, हनुमा विहारी, जयंत यादव, उमेश यादव, केएस भरत, सौरभ कुमार आणि आर अश्विन मोहालीत पोहोचले आहेत. रविवारी संध्याकाळी या खेळाडूंनी आयएस बिंद्रा स्टेडियमवरही सराव केला.

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
MI vs CSK: आयपीएल २०२४ मध्ये ऋतु’राज’, मुंबईविरूद्ध विस्फोटक फलंदाजीसह ‘हा’ विक्रम करणारा पहिला भारतीय खेळाडू
Virat's Funny reaction Video Viral
MI vs RCB : विराट कोहलीने अचानक मैदानात आपले दोन्ही कान का पकडले? VIDEO होतोय व्हायरल
Andre Russell Closed His Ears as fans cheer when ms dhoni came to bat
IPL 2024: धोनीची एंट्री होताच जल्लोष टिपेला; आंद्रे रसेलने ठेवले कानावर हात- व्हीडिओ व्हायरल
IPL 2024 Rajasthan Royals vs Royal Challengers Banglore Match Updates in Marathi
IPL 2024: आधी चहलच्या गोलंदाजीवर लगावला षटकार अन् मग केली थोबाडीत मारण्याची अ‍ॅक्शन, VIDEO होतोय व्हायरल

विराटची १००वी कसोटी

मोहालीत खेळला जाणारा कसोटी सामना विराट कोहलीच्या कारकिर्दीतील १००वा कसोटी सामना आहे. विराट कोहली आपली कसोटी संस्मरणीय करण्याचा प्रयत्न करेल. बरेच दिवस शतक झळकावू न शकलेल्या विराटने या १००व्या कसोटीत शतक झळकावण्याची शक्यता आहे. विराटने रविवारी आयएस बिंद्रा स्टेडियमवर सराव केला. विराट कोहलीचा मैदानात धावतानाचा व्हिडिओही एका क्रिकेट चाहत्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा – दिग्गज क्रिकेटपटू सोनी रामदीन यांचं निधन; त्यांचा ‘हा’ विश्वविक्रम आजही आहे अबाधित!

पंजाब क्रिकेट असोसिएशन (PCA) देखील विराटच्या १००व्या कसोटीसाठी तयारी करत आहे. प्रेक्षकांना या सामन्यासाठी स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाणार नाही. असे असतानाही पीसीएला विराटचे हा सामना ासंस्मरणीय बनवण्यासाठी कोणतीही कसर सोडायची नाही. पीसीए या सामन्यात स्टेडियममध्ये विराटचा मोठा फलक लावणार आहे.