पहिल्या सत्रात पिछाडीवर असणाऱ्या भारताने इराणवर रोमहर्षक विजय मिळवला आहे. भारताने इराणवर ३८-२९ असा शानदार विजय मिळवला आहे. दुसऱ्या सत्रात जबरदस्त पुनरागमन करत भारताने जग जिंकले आहे. भारताने सलग तिसऱ्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे.

पहिल्या सत्रात भारत १८-१३ ने पिछाडीवर होता. भारतीय चढाईपटूंना फारसे यश मिळत नसताना बचावदेखील फारसा प्रभावी ठरत नव्हता. मात्र दुसऱ्या सत्रात भारताने सर्वच आघाड्यांवर दमदार कामगिरी केली. अजय ठाकूरने अप्रतिम चढाया करत गुणांचा सपाटा लावला. अजयच्या यशस्वी चढायांमुळे भारताने इराणची आघाडी हळूहळू कमी केली. यानंतर भारताच्या बचावपटूंनी इराणच्या चढाईपटूंना निष्प्रभ करण्यास सुरुवात केली.

चढाईपटू हल्लाबोल करत असताना भारतीय बचावपटूंनी देखील शानदार कामगिरी केली. त्यामुळे भारताने आघाडी घेतली. हळूहळू भारताची आघाडी वाढत गेली. पहिल्या सत्राच्या अखेरीस १८-१३ ने पिछाडीवर असणारा भारतीय संघ दुसऱ्या सत्रात इराणला भारी पडला.

इराणचा कर्णधार मेराज शेखच्या दमदार कामगिरीमुळे पहिल्या सत्रात भारत अडखळताना दिसला. मात्र दुसऱ्या सत्रात चढाईपटू अजय ठाकूरने सामन्याचा नूर पालटून टाकला. भक्कम समजल्या जाणाऱ्या इराणच्या बचाव फळीला अजयने धक्के दिले. या धक्क्यांमुळे इराणचा आत्मविश्वास डळमळीत झाला. अजयने तब्बल १२ गुणांची कामगिरी करत भारताला महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली.

अजय ठाकूरला नितीन तोमरची तोलामोलाची साथ लाभली. नितीनने सहा गुणांची कमाई करत भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. इराणवर दोनवेळा लोण चढवताना नितीन तोमरची ही कामगिरी निर्णायक ठरली.

२४ मिनिटांनंतर भारताच्या आक्रमणाची धार आणखी तीव्र झाली. भारतीय चढाईपटू इराणची बचाव फळी भेदत असताना भारतीय बचावपटूंनी इराणच्या चढाईपटूंना यश मिळू दिले नाही. अवघ्या ८ मिनिटांमध्ये भारताने तब्बल १२ गुणांची लयलूट केली. या ८ मिनिटांमध्ये इराणला अवघ्या २ गुणांची कमाई करता आली.

चढाईपटूंच्या यशस्वी चढाया आणि त्याला बचावपटूंची लाभलेली सर्वांगसुंदर साथ यामुळे भारताने ३०-२४ अशी आघाडी घेतली. त्यानंतर भारताने ही आघाडी टिकवली. अखेर भारताने ३८-२९ असा विजय मिळवला.

याआधी भारताने २००४ आणि २००७ मध्ये कबड्डी विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. या दोन्ही स्पर्धांमध्ये भारताने अंतिम फेरीत इराणचाच पराभव केला होता. आता तिसऱ्या विश्वचषकातही इराणला पाणी पाजत अनुप कुमारच्या संघाने कबड्डीमध्ये इतिहास रचला आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरातून भारतीय कबड्डी संघावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे.

Live Updates
21:15 (IST) 22 Oct 2016
इराणवर ३८-२९ असा विजय
21:14 (IST) 22 Oct 2016
भारताने तिसऱ्यांदा जिंकला विश्वचषक
21:13 (IST) 22 Oct 2016
भारत ३७-२९ ने आघाडीवर
21:12 (IST) 22 Oct 2016
अजय ठाकूर बाद, भारत ३५-२८ ने आघाडीवर
21:11 (IST) 22 Oct 2016
इराणचा हुकमी एक्का मिराज बाद
21:09 (IST) 22 Oct 2016
भारत ३४-२५ ने आघाडीवर
21:07 (IST) 22 Oct 2016
अजय ठाकूरची पुन्हा जबरदस्त चढाई, इराणवर दुसरा लोण
21:04 (IST) 22 Oct 2016
सुरजीतकडून जबरदस्त पकड, भारताला ३०-२४ अशी आघाडी
21:03 (IST) 22 Oct 2016
इराणकडून सुपर टॅकल, इराणला दोन गुण
21:02 (IST) 22 Oct 2016
भारत २९-२२ ने आघाडीवर
21:02 (IST) 22 Oct 2016
नितीन तोमरची जबरदस्त चढाई, इराणचे दोन खेळाडू बाद
21:01 (IST) 22 Oct 2016
इराणला बोनस गुण, भारत २७-२२ ने आघाडीवर
20:57 (IST) 22 Oct 2016
भारताची दमदार कामगिरी, २७-२१ ने आघाडीवर
20:55 (IST) 22 Oct 2016
अजय ठाकूरचे सामन्यात दहा गुण
20:55 (IST) 22 Oct 2016
अजय ठाकूरची पुन्हा यशस्वी चढाई, भारत २६-२१ ने आघाडीवर
20:54 (IST) 22 Oct 2016
इराणच्या चढाईपटूची भारताकडून पकड, भारत २५-२१ ने आघाडीवर
20:50 (IST) 22 Oct 2016
भारताचा इराणवर लोण, भारताला आघाडी
20:49 (IST) 22 Oct 2016
अजय ठाकूरची पुन्हा यशस्वी चढाई, भारताला आघाडी
20:49 (IST) 22 Oct 2016
अजय ठाकूरची यशस्वी चढाई, भारताची २०-२० ने बरोबरी
20:48 (IST) 22 Oct 2016
इराण आता फक्त एका गुणाने आघाडीवर
20:47 (IST) 22 Oct 2016
सुरिंदर नाडाची जबरदस्त पकड, भारत २०-१८ ने पिछाडीवर
20:47 (IST) 22 Oct 2016
इराणकडून यशस्वी पकड, भारत २०-१७ ने पिछाडीवर
20:46 (IST) 22 Oct 2016
भारताने इराणची आघाडी ५ वरुन २ गुणांवर आणली
20:44 (IST) 22 Oct 2016
भारताचा रिव्ह्यू यशस्वी, भारत १९-१७ ने पिछाडीवर
20:42 (IST) 22 Oct 2016
अजय ठाकूरची जबरदस्त चढाई, भारताला २ गुण
20:40 (IST) 22 Oct 2016
इराणची मोठी आघाडी, इराण १९-१४ ने आघाडीवर
20:37 (IST) 22 Oct 2016
अनुपच्या चढाईतून भारताला गुण नाही, इराणची १८-१३ ने आघाडी
20:28 (IST) 22 Oct 2016
इराणची मोठी आघाडी, इराण १८ गुण, भारत १३ गुण
20:27 (IST) 22 Oct 2016
राहुल चौधरीची इराणकडून पकड, भारत १७-१२ ने पिछाडीवर
20:26 (IST) 22 Oct 2016
इराणचा भारतावर लोण, इराण १६-१२ ने आघाडीवर
20:25 (IST) 22 Oct 2016
भारताला दोन गुण, भारत १२-११ ने पिछडीवर
20:24 (IST) 22 Oct 2016
इराणची यशस्वी चढाई, भारत १२-९ ने पिछाडीवर
20:23 (IST) 22 Oct 2016
भारतीय संघ ११-९ ने पिछाडीवर
20:22 (IST) 22 Oct 2016
मोहित-नाडाची जबरदस्त पकड
20:21 (IST) 22 Oct 2016
इराणकडून अनुप कुमारची पकड, भारत १०-७ ने पिछाडीवर
20:18 (IST) 22 Oct 2016
भारताचे दोन खेळाडू बाद, इराण ९-७ ने आघाडीवर
20:17 (IST) 22 Oct 2016
भारताला बोनस गुण, भारताची ७-७ अशी बरोबरी
20:16 (IST) 22 Oct 2016
भारत ७-६ ने पिछाडीवर
20:14 (IST) 22 Oct 2016
इराण पुन्हा आघाडीवर
20:14 (IST) 22 Oct 2016
अनुप कुमारचा बोनस गुण, दोन्ही संघांचे ६ गुण
20:13 (IST) 22 Oct 2016
भारत पुन्हा ६-५ ने पिछाडीवर
20:13 (IST) 22 Oct 2016
भारताच्या बचावफळीची जबरदस्त पकड, भारत इराणचे प्रत्येकी ५ गुण
20:12 (IST) 22 Oct 2016
भारत ५-४ ने पिछाडीवर
20:09 (IST) 22 Oct 2016
भारत-इराणचे प्रत्येकी ३ गुण
20:08 (IST) 22 Oct 2016
अजय ठाकूरची जबरदस्त चढाई, भारताला १ गुण
20:08 (IST) 22 Oct 2016
इराण ३-२ ने आघाडीवर
20:07 (IST) 22 Oct 2016
भारत-इराण प्रत्येकी २ गुण
20:06 (IST) 22 Oct 2016
इराणला पहिला गुण
20:05 (IST) 22 Oct 2016
भारत २-० ने आघाडीवर
20:04 (IST) 22 Oct 2016
भारताला दुसरा गुण, अजय ठाकूरची यशस्वी चढाई