श्रीलंकेविरुद्ध आज दुसरा ट्वेन्टी-२० सामना

Kevin Pietersen's big statement on Sanju Samson
IPL 2024 : “जर मी निवडकर्ता असतो तर…”, इंग्लंडचा माजी दिग्गज केविन पीटरसनचे संजू सॅमसनबाबत मोठं वक्तव्य
d Gukesh defeated Nijat Abasov in the Candidates chess tournament sport news
गुकेश संयुक्त आघाडीवर! पाचव्या फेरीत अबासोववर मात; अन्य भारतीयांच्या लढती बरोबरीत
Mohammad Amir and Imad Wasim Returns to Pakistan National Team
फिक्सिंग, बंदी आणि निवृत्तीनंतर मोहम्मद आमिर पुन्हा पाकिस्तानच्या टी-२० संघात
Rohit breaks Dhoni's sixes record
IPL 2024 MI vs DC : रोहित शर्माने मोडला धोनीचा विक्रम! वॉर्नर-कोहलीच्या ‘या’ खास क्लबमध्येही झाला सामील

प्रामुख्याने युवा खेळाडूंभोवती संघबांधणी करण्यात आलेला भारतीय संघ शनिवारी श्रीलंकेविरुद्धच्या तीन लढतींच्या ट्वेन्टी-२० मालिकेत विजयी आघाडी घेण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. उभय संघांत धरमशाला येथे दुसरा ट्वेन्टी-२० सामना रंगणार आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्या लढतीत श्रीलंकेला ६२ धावांनी धूळ चारली. आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने भारतीय संघ युवा फळीची चाचपणी करत आहे. दुसरीकडे अनेक प्रमुख खेळाडू विविध कारणास्तव संघाबाहेर गेल्यामुळे श्रीलंकेच्या चिंतेत भर पडली आहे.

इशान, श्रेयसची दावेदारी

विंडीजविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत धावांसाठी झगडणाऱ्या इशान किशनने ८९ धावांची खेळी साकारून भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. त्याशिवाय मुंबईकर श्रेयस अय्यरनेही वेगवान अर्धशतकासाह विश्वचषकाच्या दृष्टीने संघातील स्थानासाठी दावेदारी पेश केली आहे. ऋतुराज गायकवाडच्या तंदुरुस्तीबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. 

गोलंदाजीत पर्याय उपलब्ध

पहिल्या लढतीत जसप्रीत बुमरा आणि भुवनेश्वर कुमार या प्रमुख वेगवान गोलंदाजांनी वैयक्तिक चार षटके न टाकताही भारताने श्रीलंकेला रोखले. वेंकटेश अय्यर, यजुर्वेद्र चहल मधल्या षटकांत बळी मिळवून देत आहेत. तर हर्षल पटेल हाणामारीच्या षटकांत टिच्चून गोलंदाजी करत आहे. त्यामुळे एकूणच भारताचे गोलंदाजी विभाग सर्वोत्तम लयीत असल्याचे दिसून आले.

थिक्षणाची मालिकेतून माघार


करोनाग्रस्त वानिंदू हसरंगानंतर महीष थिक्षणा या फिरकीपटूनेदेखील दुखापतीमुळे माघार घेतली आहे. त्यामुळे श्रीलंकेला वेगवान गोलंदाजांवर अवलंबून राहावे लागेल. फलंदाजीत चरिथ असलंकाकडून त्यांना पुन्हा चमकदार कामगिरीची अपेक्षा असेल. दिनेश चंडिमल, कर्णधार दसुन शनका, पथुम निसंकाला खेळ उंचवावा लागेल.

संघ

’ भारत : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, वेंकटेश अय्यर, रवींद्र जडेजा, यजुर्वेद्र चहल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज, आवेश खान, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार.

’ श्रीलंका : दसुन शनका (कर्णधार), पथुम निसंका, चरिथ असलंका, दिनेश चंडिमल, कुशल मेंडिस, दानुष्का गुणथिलका, कमिल मिशारा, जनिथ लियांगे, चमिका करुणारत्ने, दुश्मंता चमीरा, लाहिरू कुमारा, बिनुरा फर्नाडो, शिरान फर्नाडो, महीष थिक्षणा, प्रवीण जयविक्रमा, अशियान डॅनिएल, जेफ्री वॉडर्से.

’ वेळ : सायं. ७ वा. ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी