scorecardresearch

IND Vs PaK : “दिल से रिक्वेस्ट है…”, भारत विरुद्ध पाकिस्तानच्या ‘जंगी’ सामन्यापूर्वी आला प्रोमो; पाहा VIDEO

IND Vs PaK T20 Word Cup 2022 : भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात २३ ऑक्टोबरला सामना पार पडणार आहे. या सामन्यापूर्वी स्टार स्पोर्टने प्रोमो प्रसिद्ध केला आहे.

IND Vs PaK : “दिल से रिक्वेस्ट है…”, भारत विरुद्ध पाकिस्तानच्या ‘जंगी’ सामन्यापूर्वी आला प्रोमो; पाहा VIDEO
भारत पाकिस्तान संघ ( संग्रहित फोटो )

भारतीय संघ सध्या आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर मालिका खेळत आहे. त्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी रवाना होणार आहे. येथे भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध पार पडेल. या सामन्याची क्रीडाप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. त्यापूर्वी आता खास प्रोमो प्रसिद्ध झाला आहे.

भारत आणि पाकिस्तानमध्ये २३ ऑक्टोबरला मेलबर्न येथे पहिला सामना रंगणार आहे. या सामन्याआधी स्टार स्पोर्टने प्रोमो प्रसिद्ध केला आहे. यासंदर्भात स्टार स्पोर्ट्सने एक ट्वीट केलं आहे. त्यावरती लिहलं की, ‘चाहत्यांनो एकत्र येण्याची वेळ झाली आहे.’

हेही वाचा – IND vs SA 2nd T20: कर्णधार रोहित शर्माने सराव सत्राला दांडी मारल्याने चाहत्यांच्या मनात झाली चलबिचल

तसेच, या व्हिडीओमध्ये एक मुलगा दाखवला आहे, तो स्वत:ला शर्माजींचा मुलगा म्हणून सांगतो. हा मुलगा ‘दर्दनापूर’ नावाच्या शहरात राहत असून, येथील लोकांच्या नावातच फक्त वेदना आहेत. कितीही वेदना झाल्या तरी येथील लोक रडत नाहीत. मात्र, मागील वर्षी झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. तेव्हा ‘दर्दनापूर’चे लोक रडायला लागले. ते पाहून हा मुलगा म्हणतो की, “दिल से रिक्वेस्ट है. इस बार जीतकर भुला दो पिछली हार और खत्म करो इंतजार.”

क्रीडाप्रेमींना प्रोमो आवडला नाही

२०१५, २०१९ आणि २०२१ साली भारत-पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यापूर्वी ‘मौका-मौका’ हा प्रोमो चर्चेत आला होता. मात्र, यंदा स्टार स्पोर्टने प्रोमो बदलला असल्याने क्रीडाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या