बंगळूरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाचा सामना सोमवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये सनरायजर्स हैदराबाद संघाशी होणार आहे. यावेळी बंगळूरुच्या गोलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.

बंगळूरुकडे चांगल्या खेळाडूंचा भरणा आहे. मात्र, त्यांना म्हणावी तशी कामगिरी करता आलेली नाही. सहा सामन्यांत एकमेव विजयासह बंगळूरुचा संघ गुणतालिकेत तळाशी आहे. गोलंदाजांना चमक न दाखवता आल्याने त्याचा परिणाम संघाच्या कामगिरीवर पाहायला मिळाला आहे. त्यामुळे बंगळूरु संघाला आपले आव्हान कायम ठेवायचे झाल्यास हैदराबादविरुद्ध चांगली कामगिरी करण्याशिवाय पर्याय नाही. दुसरीकडे, हैदराबाद संघ पाच सामन्यांत तीन विजयांसह पाचव्या स्थानी आहे.

Rohit first Indian to hit 500 sixes
MI vs CSK : रोहित शर्माने रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याच भारतीय खेळाडूला जमलं नाही ते करून दाखवलं
Rohit Sharma Rahul Dravid and Ajit Agarkar Meeting about Hardik Pandya in T20 WC
Hardik Pandya: रोहित, द्रविड, अजित आगरकर यांची BCCI मुख्यालयात दोन तास बैठक; हार्दिक पांड्याबाबत सविस्तर चर्चा, नेमकं ठरलं काय?
Questions before the selection committee regarding the selection of Gill and Jaiswal for the Twenty20 World Cup cricket tournament
गिल की जैस्वाल? ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी निवड समितीसमोर यक्षप्रश्न
ABP Sea voters Survey
Opinion Poll : महाराष्ट्रात महायुतीला मिळणार ४८ पैकी अवघ्या ‘इतक्या’ जागा? कुठल्या जागेवर कुणाची आघाडी?

हेही वाचा >>>MI vs CSK : रोहित शर्माने रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याच भारतीय खेळाडूला जमलं नाही ते करून दाखवलं

डय़ुप्लेसिस, मॅक्सवेलवर मदार

बंगळूरुकडून विराट कोहलीने आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. कोहली सध्याच्या हंगामात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. यासह फॅफ डय़ुप्लेसिस, रजत पाटीदार आणि दिनेश कार्तिक या फलंदाजांनी मुंबई इंडियन्सविरुद्ध अर्धशतकी खेळी केल्या आहेत. त्यामुळे हैदराबादविरुद्ध त्यांच्याकडून अपेक्षा असेल. ग्लेन मॅक्सवेलची लय ही संघाच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे.

क्लासन, कमिन्सचा कस

सनरायजर्स हैदराबादकडून हेन्रिक क्लासन (१८६) व अभिषेक शर्मा (१७७) यांनी आक्रमक फलंदाजी केली आहे. तर, ट्रॅव्हिस हेड (१३३) यानेही सातत्यपूर्ण खेळ केला आहे. हे तीनही फलंदाज लयीत असल्यास प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांना अडचणीत आणू शकतात. मात्र, त्यांच्या गोलंदाजांनाही अजूनपर्यंत चमक दाखवता आलेली नाही.

वेळ : सायं. ७.३० वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, जिओ सिनेमा.