scorecardresearch

बॅडमिंटनपटू जयरामची निवृत्ती

या खेळाने माझ्या जीवनाला आकार दिला, मला शिकवले, घडवले आणि मोठी स्वप्ने दिली.’

नवी दिल्ली : भारताच्या अजय जयरामने रविवारी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमधून निवृत्ती जाहीर करताना दोन दशकांच्या कारकीर्दीला पूर्णविराम दिला.

३४ वर्षीय जयरामने समाजमाध्यमांवर निवृत्तीची घोषणा करताना म्हटले की, ‘‘मी आज जो काही आहे, त्याचे श्रेय बॅडमिंटनला जाते. या खेळाने माझ्या जीवनाला आकार दिला, मला शिकवले, घडवले आणि मोठी स्वप्ने दिली.’’ याचप्रमाणे आता ‘एमबीए’ करणार असल्याचेही त्याने म्हटले आहे. ‘‘सर्व चांगल्या गोष्टींचा शेवट होत असतो. मी माझ्या दोन दशकांच्या कारकीर्दीचा निरोप घेताना अतिशय भावनिक झालो आहे,’’ असे जयरामने म्हटले. जयरामने डच खुली बॅडमिंटन स्पर्धा दोनदा जिंकली होती, तर २०१५मध्ये कोरिया खुल्या स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले होते.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Indian shuttler ajay jayaram retires from international badminton zws

ताज्या बातम्या