भारताचा जलतरणपटू श्रीहरी नटराजनला मिळालं ऑलिम्पिकचं तिकीट

टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रथमच दोन भारतीय जलतरणपटूंना थेट पात्रतेद्वारे ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळणार आहे

Indian swimmer srihari nataraj qualified for Tokyo Olympics
भारताचा जलतरणपटू श्रीहरी नटराजन

भारतीय जलतरणपटू श्रीहरी नटराजनने पुढील महिन्यात होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रता दर्शवली आहे. जागतिक संस्था फिनाने रोममधील सेटे कॉली करंडक स्पर्धेतील पुरुषांच्या १०० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारातील ‘अ’ पात्रता निकषाला मान्यता दिली. यानंतर नटराजला ऑलिम्पिकचे तिकीट मिळाले आहे.

स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाने (एसएफआय) ट्विट करत सांगितले, “श्रीहरी नटराजाची ऑलिम्पिक पात्रतेची वेळ फिनाने मंजूर केली आहे. एसएफआयने एफआयएनएला आपले निवेदन पाठवले होते. श्रीहरी टोकियोमध्ये भारताच्या साजन प्रकाशसोबत असेल.” नटराजने ऑलिम्पिक पात्रतेसाठी लागणाऱ्या ५३.७७ सेकंदाच्या वेळेचा निकष पूर्ण करत राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. वेळ चाचणीत जलतरणपटूंना इतर प्रतिस्पर्ध्यांशी स्पर्धा करण्याची संधी मिळत ​​नाही, परंतु तो त्याच्या वेळेत सुधारणा करू शकतो. टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रथमच दोन भारतीय जलतरणपटूंना थेट पात्रतेद्वारे ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळणार आहे.

 

हेही वाचा – इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का!

साजन प्रकाशचे ऐतिहासिक यश

रोम येथील सेटे कॉली करंडक जलतरण स्पर्धेत साजन ऑलिम्पिक पात्रतेचे ‘अ’ निकष गाठणारा भारताचा पहिला जलतरणपटू ठरला. पुरुषांच्या २०० मीटर बटरफ्लाय प्रकारात २७ वर्षीय साजनने १:५६.३८ मिनिटांत निर्धारित अंतर गाठले. ऑलिम्पिक पात्रतेचे ‘अ’ निकष मिळवण्यासाठी १:५६.४८ मिनिटांत हे अंतर सर करणे गरजेते होते. साजनने ०.१० सेकंदापूर्वीच ही कामगिरी केली. त्याशिवाय साजनने स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला. गेल्या आठवड्यात बेलग्रेड येथे झालेल्या स्पर्धेत साजननेच १:५६.९६ मिनिटांचा विक्रम नोंदवला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Indian swimmer srihari nataraj qualified for tokyo olympics adn

ताज्या बातम्या