इन्फोसिस संघाने एसीआय करंडक आंतर माहिती तंत्रज्ञान (आयटी) ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद पटकाविले. त्यांनी अंतिम लढतीत टेक मिहद्र संघाला आठ गडी राखून पराभूत केले.
विनय कामत (३/५), संतोष देसाई (२/९) व प्रशांत पन्वर (२/११) यांच्या भेदक गोलंदाजीपुढे टेक महिंद्रा संघाचा डाव ११.२ षटकांत केवळ ५१ धावांमध्ये कोसळला. त्यानंतर इन्फोसिस संघाने फक्त ७.२ षटकांत हे आव्हान पार केले. इन्फोसिस संघाच्या संदीप अभ्यंकर याला अंतिम सामन्याचा मानकरी पारितोषिक देण्यात आले. अमृत अलोक याने स्पर्धेचा मानकरी बक्षीस पटकाविले तर अंकित जैन व सुतीर्थ बागची हे अनुक्रमे सवरेत्कृष्ट गोलंदाज व फलंदाज ठरले.
संक्षिप्त निकाल
टेक महिंद्रा-११.२ षटकांत सर्वबाद ५१ (मधु कामत ३२, विनय कामत ३/५, संतोष देसाई २/९, प्रशांत पन्वर २/११) पराभूत वि. इन्फोसिस २ बाद ५७ (संदीप अभ्यंकर नाबाद ३०).
संग्रहित लेख, दिनांक 22nd Jan 2013 रोजी प्रकाशित
आंतर-आयटी क्रिकेट स्पर्धेत इन्फोसिसला विजेतेपद
इन्फोसिस संघाने एसीआय करंडक आंतर माहिती तंत्रज्ञान (आयटी) ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद पटकाविले. त्यांनी अंतिम लढतीत टेक मिहद्र संघाला आठ गडी राखून पराभूत केले.
First published on: 22-01-2013 at 12:12 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inter it cricket competitioninfosys win