IPL 2024 starts from March 22 1st Match CSK vs RCB : इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या १७ व्या हंगामाचे वेळापत्रक गुरुवारी (२२ फेब्रुवारी) जाहीर करण्यात आले. २२ मार्चपासून भारतात ही स्पर्धा रंगणार आहे. पहिल्या सामन्यात गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज संघ आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमने सामने येणार आहेत. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयपीएलने अर्धच वेळापत्रक जाहीर केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मे महिन्यात केंद्रातील मोदी सरकारचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. त्यामुळे त्याआधी भारतात सार्वत्रिक निवडणुका होण्याची शक्यता आहे. या सार्वत्रिक निवडणुकांच्या आधीच आयपीएलचा हंगाम सुरू होत आहे. त्यामुळे आयपीएलच्या २१ सामन्यांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

महिला प्रीमियर लीगचा अंतिम सामना दिल्लीत खेळवला जाईल, त्यानंतर लगेचच आयपीएलसाठी मैदान तयार करण्यास वेळ लागेल. त्यामुळे दिल्लीचे पहिले दोन सामने विशाखापट्टणम येथे होणार आहेत. देशात यावर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे आयपीएलचे पूर्ण वेळापत्रक जाहीर झालेले नाही. आता १७ दिवसांचा कार्यक्रम समोर आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले जाईल.

हेही वाचा >> IPL 2024 : आयपीएलच्या सलामीच्या लढतीत महेंद्रसिंग धोनी- विराट कोहली आमनेसामने, २१ सामन्यांचं वेळापत्रक जाहीर

बीसीसीआयने निवेदनात म्हटले आहे की, “भारतातील आगामी लोकसभा निवडणुकांशी संबंधित सर्व आवश्यक नियम आणि सूचनांचे पालन करून बीसीसीआय सरकार आणि सुरक्षा यंत्रणांबरोबर काम करणार आहे. अठराव्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर, बोर्ड पहिल्या दोन आठवड्यांच्या वेळापत्रकाशी संबंधित सर्व समस्यांचे निराकरण करेल. यानंतर बीसीसीआय मतदानाच्या तारखा लक्षात घेऊन उर्वरित हंगामाचे वेळापत्रक निश्चित करण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करेल.”

आयपीएलचा संपूर्ण हंगाम भारतातच होणार

आयपीएल २०२४ मधील संपूर्ण सामने भारतातच खेळले जाणार असल्याची प्रतिक्रिया आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमाळ यांनी दिली होती. २००९ मध्ये निवडणुकांमुळे आयपीएलचा संपूर्ण हंगाम दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आला होता. तर, २०१४ मध्ये निवडणुकांमुळे आयपीएल हंगामातील काही सामने युएईत खेळवण्यात आले होते. तसंच, २०१९ मध्ये मात्र लोकसभेच्या निवडणुका असतानाही आयपीएलचा संपूर्ण हंगाम देशातच आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे आताही पुढील टप्प्यातील सामन्यांचं वेळापत्रक जाहीर झाले नसले तरीही हा हंगाम भारतातच आयोजित करण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2024 half schedule of ipl announced due to lok sabha elections when will the remaining matches be held sgk
First published on: 22-02-2024 at 19:57 IST