Irfan Pathan statement on Jos Buttler : आयपीएल २०२४ मध्ये दमदार सुरुवात करून अव्वल स्थानावर राहणाऱ्या राजस्थान रॉयल्सला आता सलग चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. गुवाहाटी येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील संघाचा पंजाब किंग्जने ५ विकेट्सने पराभव केला. प्लेऑफ्सपूर्वी राजस्थानच्या खराब फॉर्ममुळे त्यांना स्पर्धेतून आधीच बाहेर पडलेल्या संघाच्या हातून पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे एकीकडे कर्णधार सॅमसनसह संपूर्ण राजस्थान संघ निराश झाला आहे, तर दुसरीकडे माजी क्रिकेटपटू इरफान पठाण संतापला होता आणि याला कारण होता राजस्थानचा एक खेळाडू.

या सामन्यात राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना केवळ १४५ धावा केल्या. यावेळी संघाचे सर्व आघाडीचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले आणि केवळ रियान परागने थोडी ताकद दाखवत ४८ धावा केल्या, ज्याच्या जोरावर संघाला ही धावसंख्या गाठता आली. पंजाबलाही ही धावसंख्या गाठण्यासाठी संघर्ष करावा लागला, पण लक्ष्य फार मोठे नसल्याने संघाने ते साध्य केले. पंजाबच्या या विजयाचा शिल्पकार कर्णधार सॅम करन ठरला, त्याने २ बळी घेतले आणि त्यानंतर नाबाद ६१ धावा करत संघाला विजय मिळवून दिला.

IPL 2025 Players Retention Highlights in Marathi| IPL 2025 Retained & Released Players List Squad
IPL 2025 Retention Highlights : हेनरिक क्लासेन ठरला रिटेन्शन यादीतील सर्वात महागडा खेळाडू! धोनी चेन्नईकडे तर रोहित मुंबईकडे कायम
‘आयपीएल’ मध्ये सहा खेळाडूंना कायम ठेवण्यास मान्यता | Approval to retain six players in IPL sport news
IPL : आयपीएल संघांना ६ खेळाडू रिटेन करता…
Rishabh Pant's Reaction on Rahul Goenka Controversy
Rishabh Pant : राहुल-गोयंकांच्या वादावादीच्या व्हिडीओवर ऋषभ पंतचं भाष्य; म्हणाला, “मलाही अनेकदा…”
BCCI Got Fake Head Coach Applications named Narendra Modi Tendulkar dhoni
नरेंद्र मोदी, सचिन तेंडुलकर, अमित शाह यांच्या नावाने भारताच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज, वाचा काय घडलं
Rinku Singh Statement on IPL Salary
IPL 2024: ५५ लाख रुपयांच्या मानधनावरुन रिंकू सिंग म्हणाला
Riyan Parag Youtube History Video Viral
VIDEO: ‘अनन्या पांडे हॉट, सारा अली खान…’, रियान परागची युट्युब सर्च हिस्ट्री Viral, नेमकं काय घडलं?
russell dances with ananya pandey on SRK Lut put gay song
लुट पुट गया…आंद्रे रसेल आणि अनन्या पांडेचा डान्स करतानाचा व्हीडिओ व्हायरल,कोच चंद्रकांत पंडितही थिरकले
KKR 3rd time IPL champions
IPL 2025 : मोठ्या लिलावापूर्वी कोलाकाता संघ कोणत्या चार खेळाडूंना ‘रिटेन’ करु शकतो? जाणून घ्या
These five uncapped players will likely be seen playing for Team India
Team India : अभिषेक-रियानसह ‘हे’ पाच खेळाडू लवकरच भारतासाठी खेळताना दिसणार, पाहा कोणत्या दौऱ्यात मिळणार संधी?

इरफान पठाण का आणि कोणावर संतापला?

राजस्थानचा पराभव होत असतानाच आयपीएलमध्ये समालोचन करणाऱ्या भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने उघडपणे नाराजी व्यक्त केली. त्याची नाराजी राजस्थान रॉयल्सचा दिग्गज सलामीवीर जोस बटलर या सामन्यात खेळत नसल्याबद्दल होती. हे देखील इरफानच्या नाराजीचे कारण होते. कारण बटलर हंगाम संपण्यापूर्वीच त्याच्या देशात इंग्लंडला परतला आहे. इरफानने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये त्याने बटलरचे अचानक परतणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. पठाण म्हणाला की, सर्व फ्रँचायझींना हे लक्षात ठेवावे लागेल की संपूर्ण हंगामासाठी कोणताही परदेशी खेळाडू उपलब्ध नसेल, तर त्यांनी हे आधीच सांगावे, अन्यथा त्या खेळाडूची निवड करू नये.

हेही वाचा – RR vs PBKS : २२ वर्षीय रियान परागचा मोठा पराक्रम! मिचेल मार्श आणि सूर्यकुमार यादवच्या खास क्लबमध्ये झाला सामील

इरफान पठाण जोस बटलरवर संतापला –

जोस बटलरचा उल्लेख करताना इरफान पठाण म्हणाला की, “तो राजस्थानच्या शेवटच्या २ सामन्यांसाठी आणि नंतर प्लेऑफ सामन्यांसाठी उपलब्ध नाही, ज्याचा संघावर परिणाम होईल. जर एखाद्या खेळाडूने संपूर्ण हंगाम खेळण्याचे आश्वासन दिले, तर त्याने ते पूर्ण करावे, हा नियम प्रत्येक फ्रँचायझीला लागू असावा. देशाला पहिले प्राधान्य असले पाहिजे, या मताशी मी सहमत आहे. पण जर तुम्ही वचन दिले असेल तर तुम्ही संपूर्ण हंगाम खेळला पाहिजे, अन्यथा येण्याची गरज नाही.”

हेही वाचा – “…तर तुम्ही मला बराच काळ पाहू शकणार नाही”, विराट कोहलीचं निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य

इंग्लंडचे खेळाडू मायदेशी परतले –

खरं तर, इंग्लंड क्रिकेट बोर्डाने २ जूनपासून सुरू होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर अचानक आपल्या खेळाडूंना परत बोलावण्याचा निर्णय घेतला होता. विश्वचषकापूर्वी इंग्लंडला पाकिस्तानविरुद्ध टी-२० मालिका खेळायची आहे, त्यामुळे बोर्डाने हा निर्णय घेतला. आता यामुळे राजस्थानसह अनेक फ्रँचायझींसाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. केवळ बटलरच नाही, तर प्लेऑफमध्ये पोहोचलेले किंवा त्याच्या शर्यतीत असलेले कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्जसारख्या संघांचे इंग्लिश खेळाडू एक-दोन दिवसांत परतले आहेत किंवा परततील.