Riyan Parag has become 5th uncapped player to score more than 500 runs in an IPL season : राजस्थान रॉयल्स संघ विजयाच्या मार्गावरून दूर गेला आहे. त्याला सलग ४ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्के करणाऱ्या राजस्थान रॉयल्सला पंजाब किंग्जविरुद्ध खेळण्यात आलेल्या सामन्यात ५ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात राजस्थानच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. मात्र २२ वर्षीय रियान परागने या सामन्यातही अप्रतिम कामगिरी केली. तो आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नसला, तरी त्याने एक खास विक्रम आपल्या नावावर केला.

२२ वर्षीय रियान परागचा मोठा पराक्रम –

या सामन्यात रियान परागने ३४ चेंडूत ४८ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने ६ चौकार मारले. यासह त्याने या मोसमात ५०० हून अधिक धावा केल्या आहेत. आयपीएलच्या एका मोसमात ५०० हून अधिक धावा करणारा तो पाचवा अनकॅप्ड खेळाडू ठरला आहे. आयपीएलमध्ये ही कामगिरी करणारा शॉन मार्श पहिला खेळाडू आहे. यानंतर, सूर्यकुमार यादव, इशान किशन आणि यशस्वी जैस्वाल यांनी देखील अनकॅप्ड खेळाडू म्हणून आयपीएलच्या एका हंगामात ५०० हून अधिक धावा केल्या आहेत.

"Either be available for full season or don’t come", Irfan Pathan lashes out at overseas players for leaving IPL 2024 midway
RR vs PBKS : ‘…तर खेळायलाच येऊ नका’; राजस्थानच्या पराभवानंतर ‘या’ खेळाडूवर संतापला इरफान पठाण
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
sharad pawar raj thackeray
“राज ठाकरेंचं महाराष्ट्राच्या राजकारणातील स्थान काय?”, शरद पवारांचा टोला, ‘त्या’ टीकेवर दोन वाक्यात प्रत्युत्तर
Sachin Tendulkar Son Arjun Tendulkar Aggression
२ चेंडूंवर, २ षटकार व सचिन तेंडुलकरच्या लेकाची माघार; अर्जुनला खुन्नस देणं पडलं महाग, MI vs LSG ची नाट्यमय ओव्हर पाहा
DC beat RR by 20 Runs sanju samson wicket Controversy
IPL 2024: संजू सॅमसनला बाद देण्याचा निर्णय वादग्रस्त; राजस्थान पराभूत, प्लेऑफ प्रवेश लांबणीवर
IPL 2024 Playoffs Scenario for RCB
IPL 2024: १८ धावा किंवा १८.१ षटके… आरसीबी की चेन्नई कोण गाठणार प्लेऑफ, वाचा कसं आहे समीकरण?
uddhav thackeray narendra modi (1)
“…तर मी मोदींसाठी धावून जाईन”, पंतप्रधानांच्या हाकेला उद्धव ठाकरेंची साद? म्हणाले, “त्यांच्यासाठी…”
Virat Kohli Statement on His Retirement Plans
“…तर तुम्ही मला बराच काळ पाहू शकणार नाही”, विराट कोहलीचं निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य

आयपीएलच्या एका हंगामात ५०० हून अधिक धावा करणारे अनकॅप्ड खेळाडू –

२००८ – शॉन मार्श
२०१८ – सूर्यकुमार यादव
२०२० – इशान किशन
२०२३ – यशस्वी जैस्वाल
२०२४ – रियान पराग

हेही वाचा – ‘जोपर्यंत गंभीर हसत नाही…’ चाहतीच्या ‘त्या’ पोस्टरला गौतमने दिले उत्तर, इन्स्टाग्रामवर शेअर केलेला खास फोटो व्हायरल

आयपीएलच्या एका हंगामात अनकॅप्ड फलंदाजांच्या सर्वाधिक धावा –

६२५ धावा – यशस्वी जैस्वाल
६१६ धावा – शॉन मार्श
५३१ धावा – रियान पराग
५१६ धावा – इशान किशन
५१२ धावा – सूर्यकुमार यादव

रियान परागची आयपीएल २०२४ मधील कामगिरी –

या हंगामात रियान पराग राजस्थान रॉयल्ससाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने १३ सामन्यात ५९.०० च्या सरासरीने ५३१ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये ४ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने १५२.५९ च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या आहेत. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तो सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. रियान परागने या हंगामात ३१ षटकार मारले आहेत, जे भारतीय फलंदाजाने मारलेले तिसरे सर्वाधिक षटकार आहेत.

हेही वाचा – “…तर तुम्ही मला बराच काळ पाहू शकणार नाही”, विराट कोहलीचं निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य

आयपीएल २०२४ मध्ये सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय –

अभिषेक शर्मा – ३५ षटकार
विराट कोहली – ३५ षटकार
रियान पराग – ३१ षटकार