scorecardresearch

गुजरातपुढे पंजाबचे आव्हान

‘आयपीएल’मध्ये मंगळवारी पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स हे संघ आमनेसामने येणार आहेत.

नवी मुंबई : ‘आयपीएल’मध्ये मंगळवारी पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स हे संघ आमनेसामने येणार आहेत. या सामन्यात विजयानिशी बाद फेरीतील प्रवेश निश्चित करण्यास गुजरातचा संघ उत्सुक असून त्यांचा विजयरथ रोखण्याचा पंजाबचा प्रयत्न असेल. पंजाबचे नऊ सामन्यांत आठ गुण असून ते गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहेत. दुसरीकडे, गुजरातचे नऊ सामन्यांत १६ गुण असून त्यांनी केवळ एक सामना गमावला आहे.

पंडय़ा, तेवतियावर नजर

यंदा ‘आयपीएल’मध्ये पदार्पण करणाऱ्या गुजरातच्या संघाने आतापर्यंत मोठमोठय़ा संघांना पराभवाचा धक्का दिला आहे. फलंदाजीत कर्णधार हार्दिक पंडय़ासह राहुल तेवतिया, डेव्हिड मिलर, वृद्धिमान साहा आणि रशीद खान यांनी मोक्याच्या क्षणी उत्तम खेळी करून संघाला विजय मिळवून दिले आहेत. 

कामगिरी उंचावण्याचे आव्हान

पंजाबच्या संघाला यंदा अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. फलंदाजीत कर्णधार मयांक अगरवाल, शिखर धवन, जॉनी बेअरस्टो आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव आहे. गोलंदाजीत कॅगिसो रबाडा आणि अर्शदीप सिंग टिच्चून मारा करत आहेत.

  • वेळ : सायं. ७.३० वा. ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदी

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ipl 2022 punjab challenge to gujarat ipl face to face curious ysh

ताज्या बातम्या