Mayank Yadav revealed that Dale Steyn is his ideal player : आयपीएल २०२४ मधील ११वा सामना शनिवारी पंजाब किंग्ज आणि लखनऊ सुपरजायंट्स यांच्यात खेळला. या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्सने पंजाब किंग्जवर २१ धावांनी विजय मिळवला. लखनऊच्या या विजयात मंयक यांदवने महत्त्वाची भमिका बजावली. पदापर्णाचा सामना खेळणाऱ्या मयंक यादवने पंजाबविरुद्ध १५५.८ प्रतितास वेगाने गोलंदाजी करत आयपीएलच्या या हंगामातील सर्वात वेगवान चेंडू टाकत सर्वांना चकित केले. सामन्यानंतर मंयक यांदवने आपल्या आदर्शा खेळाडूबद्दल खुलासा केला.

लखनऊ दिलेल्या २०० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्जने दमदार सुरुवात केली. शिखर धवन आणि जॉनी बेअरस्टो यांच्यात पहिल्या विकेटसाठी १०२ धावांची भागीदारी झाली. त्यामुळे पंजाब हा सामना सहज जिंकणार असे वाटत होते, परंतु या सामन्यात पदार्पण करणाऱ्या मयांक यादवने जॉनी बेअरस्टोला बाद करुन लखनौला पहिले यश मिळवून दिले. त्यानंत त्याने प्रभसिमरन सिंगला बाद केले. एवढेच नाही तर जितेश शर्मालाही या घातक गोलंदाजाने बाद केले.

डेल स्टेन मयंकचा आदर्श खेळाडू –

या सामन्यात त्याने ताशी १५० किमीपेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करत पंजाबच्या जबड्यातून सामना हिसकावून घेतला. या उत्कृष्ट कामगिरीसाठी मयंकला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. यानंतर जेव्हा मयंकला विचारण्यात आले की, तुझा आदर्श खेळाडू कोण आहे, तेव्हा तो म्हणाला की भारतीय नाही, तर दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेन हा त्याचा आदर्श खेळाडू आहे. मयंकने या सामन्यात १५५.८ प्रतितास वेगाने चेंडू शिखर धवनला टाकला होता.

हेही वाचा – IPL 2024 Mumbai Indians: हार्दिकचं ट्रोलिंग सुरूच; कोणी कोणी सांभाळली आहे मुंबई इंडियन्सच्या नेतृत्वाची धुरा; जाणून घ्या

मयंकला लहानपणापासूनच वेगाची आवड –

सामन्यानंतर मयंक म्हणाला, “पदार्पणाच्या सामन्यात दडपण असते, असे मला अनेकांनी सांगितले होते, पण पंजाबविरुद्ध मला तसे वाटले नाही. जेव्हा कर्णधार केएल राहुलने मला चेंडू दिला तेव्हा मला वाटले की मी या जागेसाठी पात्र आहे. मी ताशी १५६ चा वेग गाठण्याची ही पहिलीच वेळ होती. यापूर्वी मी ताशी १५५ किमी वेगाने गोलंदाजी केली होती. मला लहानपणापासून वेगाची आवड आहे.”