MS Dhoni Reveals The Reason Behind CSK Defeat Against KKR : कोलकाता नाईट रायडर्सविरोधात झालेल्या सामन्यात सीएसकेचा पराभव कोणत्या कारणांमुळे झाला, यावर कर्णधार एम एस धोनीनं मोठी प्रतिक्रिया दिली आहे. पराभवामागे नेमकी कोणती कारणं होती, याबाबत धोनीनं खुलासा केला आहे. धोनी माध्यमांशी बोलताना म्हणाला, मैदानात पडलेला दव या सामन्यावर परिणाम करून गेला आणि दुसऱ्या इनिंगमध्ये फलंदाजी सोपी झाली. पहिल्या इनिंगमध्ये फिरकीपटूंसाठी खेळपट्टी अनुकूल होती आणि त्यांच्याकडून काही चुका झाल्या.

चेन्नई सुपर किंग्जला कोलकाता नाईट रायडर्सविरोधात झालेल्या या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. सीएसकेनं प्रथम फलंदाजी करून २० षटकांमध्ये ६ विकेट्स गमावत १४४ धावा केल्या. त्यानंतर या धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सने १८.३ षटकात ४ विकेट्स गमावत १४७ धावा केल्या आणि या सामन्यात विजय मिळवला. सीएसकेचा पराभव झाला असतानाही प्ले ऑफच्या शर्यतीत संघ कायम आहे. परंतु, यासाठी त्यांना लीगचा शेवटचा सामना जिंकावा लागेल.

Axar Patel on Impact Player Rule in IPL 2024
IPL 2024 : अक्षर पटेलने ‘इम्पॅक्ट प्लेयर’च्या नियमावर उपस्थित केला प्रश्न, सांगितले ‘या’ खेळाडूंसाठी का आहे धोकायदायक?
Rasikh Salam Dar was reprimanded for breaching the IPL code of conduct
DC vs GT : रसिख सलाम दारला ‘ती’ चूक पडली महागात, बीसीसीआयने वेगवान गोलंदाजाला फटकारले
Jos Buttler's record-breaking century
KKR vs RR : जोस बटलरचं धोनी-कोहलीबद्दल मोठं वक्तव्य; म्हणाला, “ते दोघे ज्या प्रकारे शेवटपर्यंत…”
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव

नक्की वाचा – RCB साठी अनुज रावत ठरला हिरो! धोनी स्टाईलने रनआऊट करून हेटमायरचा झंझावात थांबवला, पाहा जबरदस्त Video

एम एस धोनीनं माध्यमांशी बोलताना म्हटलं, नाणेफेक जिंकल्यानंतर तुम्ही अनेकदा फलंदाजीचा निर्णय घेता. परंतु, या खेळपट्टीवर दुसऱ्या इनिंगमध्ये पहिला चेंडू फेकल्यावर मला समजलं की, ही खेळपट्टी १८० धावांची आहे. प्रथम फलंदाजी करून ही धावसंख्या करू शकलो नसतो. मैदानात दव पडल्याने खूप जास्त फरक पडला, असं मला वाटतं. जर तुम्ही दुसऱ्या इनिंगची तुलना पहिल्या इनिंगशी केली, तर त्यांच्या फिरकीपटूंना जास्त मदत मिळाली होती आणि याच कारणामुळं आम्ही या सामन्यात मागे पडलो. आम्हा या पराभवासाठी कुणाला जबाबदार ठरवू शकत नाही. सर्वांनी खूप प्रयत्न केले. दुसऱ्या इनिंगमध्ये दव पडला नसता आणि जर आम्ही १५० चेज करत असतो, तर खूप अडचणींचा सामना करावा लागला असता.