RCB fans abuse CSK fans video viral : आयपीएल २०२४ मधील ६८व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नई सुपर किंग्जला हरवून प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले. अशाप्रकारे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेऑफमध्ये पोहोचणारा चौथा संघ ठरला. त्याचवेळी, यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे खेळाडू आणि चाहत्यांनी जल्लोष साजरा केला. हा जल्लोष मैदानाच्या आत आणि बाहेर दिसत होता. तसेच सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये आरसीबीचे काही चाहते सीएसकेच्या चाहत्यांशी गैरवर्तन करत असल्याचे दिसत आहेत.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल –

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे चाहते चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांशी गैरवर्तन करताना दिसत आहेत. त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये आरसीबीचे चाहते पिवळी जर्सी घातलेल्या चेन्नईच्या चाहत्यांचा रस्ता अडवत आहेत. याशिवाय ते तोंडाजवळ आरसीबी-आरसीबी ओरडत आहेत. आरसीबीचे चाहते इथेच थांबले नाहीत तर त्यांनी जर्सी धरून अनेक चाहत्यांना ओडताना दिसले. मात्र, हे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स सातत्याने कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने प्लेऑफमध्ये केला प्रवेश –

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नई सुपर किंग्जचा २७ धावांनी पराभव केला. अशाप्रकारे सलग सहाव्या विजयानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने प्लेऑफमध्ये प्रवेश केला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने २० षटकांत ५ गडी गमावून २१८ धावा केल्या होत्या. याला प्रत्युत्तर देताना चेन्नई सुपर किंग्जला २० षटकांत ७ विकेट गमावत १९१ धावाच करता आल्या. अशाप्रकारे ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जला २७ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

हेही वाचा – IPL 2024 : ‘आता तुला कसं वाटतयं आई?’, आरसीबीला विजय मिळवून दिल्यानंतर यश दयाल व्हिडीओ कॉलवर भावूक

शेवटच्या षटकात यश दयालची निर्णायक गोलंदाजी –

पहिल्या चेंडूवर धोनीने फाइन लेगवर जोरदार शॉट खेळला आणि ११० मीटरचा षटकार मारला. आता संघाला पाच चेंडूत ११ धावांची गरज होती, पण पुढच्याच चेंडूवर धोनी स्वप्नील सिंगच्या हाती झेलबाद झाला. यानंतर शार्दुल ठाकूर फलंदाजीला आला. तिसऱ्या चेंडूवर एकही धाव आली नाही. आता सीएसके संघाला तीन चेंडूत ११ धावांची गरज होती. चौथ्या चेंडूवर शार्दुलने थर्ड मॅनच्या दिशेने शॉट खेळला आणि एक धाव घेतली. आता चेन्नईला प्लेऑप्समध्ये पात्र ठरण्यासाठी दोन चेंडूत १० धावांची गरज होती. जडेजा क्रीजवर स्ट्राइकवर होते. दयालने ओव्हरच्या शेवटचे दोन्ही चेंडू डॉट्स टाकले, ज्यामुळे आरसीबीच्या विजयावर शिक्कामोर्तब झाला.