Krunal Pandya entry in Hardik Natasa Divorce: भारताचा क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि त्याची पत्नी अभिनेत्री-मॉडेल नकाशा स्टॅनकोविक हे जोडपं वेगळ होणार असल्याच्या चर्चांनी सोशल मीडियावर उधाण आलं आहे. हार्दिक-नताशा घटस्फोट घेणार असल्याची बातमी वणव्सारखी सगळीकडे पसरली आहे. या दरम्यान नताशा सोशल मीडियावर सक्रिय आहे. एकीकडे त्यांच्या विभक्त होण्याच्या बातम्या जोरात आहेत, तर दुसरीकडे हार्दिक पंड्याचा भाऊ आणि क्रिकेटर कृणाल पंड्याच्या पोस्टवर नताशाची कॉमेंट व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नताशा स्टॅनकोविकने हार्दिकचा भाऊ कृणालच्या पोस्टवर अशी कमेंट केली आहे की ज्यामुळे चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिच्या या कमेंटमुळे नेमकं पंड्या कुटुंबामध्ये चाललंय काय, असे प्रश्न लोकांच्या मनात आहेत. त्याचवेळी नताशाची कमेंट पाहून काहींनी तर नताशा-हार्दिकबद्दल सुरू असलेल्या चर्चांवर कृणालने वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतल्याचेही म्हटले आहे.

हेही वाचा – “मी तेव्हा २६ वर्षांचा होतो, आज ५१ व्या वर्षी…”, वडिलांच्या आठवणीत सचिन तेंडुलकर व्याकूळ, जुन्या खुर्चीजवळ उभा राहून म्हणाला…

आयपीएल २०२४ च्या हंगामानंतर घरी परतलेल्या कृणालने मुलांसोबत फोटो शेअर केले. कृणाल पंड्याने त्याचा मुलगा कवीर आणि हार्दिकचा मुलगा अगस्त्यसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. दोघेही एकमेकांसोबत खेळताना आणि वेळ घालवताना दिसत आहेत. कृणालच्या या पोस्टवर नताशाने स्माइली आणि हार्ट इमोजीसह प्रतिक्रिया दिली आहे. हार्दिकपासून घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान नताशाच्या या कमेंटने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

नताशा स्टॅनकोविकने हार्दिकचा भाऊ कृणालच्या पोस्टवर अशी कमेंट केल्याने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिच्या या कमेंटमुळे नेमकं पंड्या कुटुंबामध्ये चाललंय काय, असे प्रश्न लोकांच्या मनात आहेत. त्याचवेळी नताशाची कमेंट पाहून काहींनी तर नताशा-हार्दिकबद्दल सुरू असलेल्या चर्चांवर कृणालने वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतल्याचेही म्हटले आहे. तर या दोघांच्या घटस्फोटाची अफवा आहे असं काहींच म्हणणं आहे.

२५मे रोजी Reddit वर एक पोस्ट आली होती, ज्यानुसार नताशाने इंस्टाग्रामवर हार्दिकसोबतचे तिचे काही जुने फोटो डिलीट केले आहेत तर तिच्या युजरनेममधून पंड्या हे नाव देखील काढून टाकले आहे. पण सध्या सुरू असलेल्या घटस्फोटांच्या चर्चांवर हार्दिक किंवा नताशाने काहीच वक्तव्य केलेले नाही. घटस्फोटानंतर हार्दिकची ७० टक्के प्रॉपर्टी नताशाच्या नावावर होईल, अशी चर्चा आहे. तर हार्दिकची प्रॉपर्टीही त्याच्या आईच्या नावे असल्याचे त्याने एका मुलाखतीत सांगितले होते. यावरून अनेक रिल्स , व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

१ जानेवारी २०२० रोजी दोघांनीही रिलेशनशिपमध्ये असून साखरपुडा केल्याचे जाहीर केले होते. नंतर ३१ मे २०२० रोजी लॉकडाऊनमध्ये दोघांनी लग्न केले. त्याच वर्षी ३० जुलै रोजी त्यांना अग्स्त्य नावाचा मुलगा झाला. लग्नाच्या जवळपास तीन वर्षांनी पंड्या आणि नताशा यांनी फेब्रुवारी २०२३ मध्ये उदयपूरमध्ये मोठ्या थाटामाटात पुन्हा लग्न केले. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने उदयपूरमध्ये केलेल्या विवाहात दोन्ही पध्दतीने रितीरावाजाप्रमाणे लग्न केले. यावेळी जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य सहभागी झाले होते. नताशाने तिच्या युट्युबवर त्यांच्या लग्नाचे व्हीडिओ शेअर केले होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hardik pandya natasa divorce news natasa stankovic comment on krunal pandya instagram post went viral bdg
First published on: 26-05-2024 at 18:05 IST