Shardul Thakur Takes Wicket Of Nicholas Pooran Video Viral : आयपीएल २०२३ चा ६८ वा सामना कोलकाताच्या ईडन गार्डनमध्ये लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होत आहे. कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या लखनऊच्या फलंदाजांची सुरुवातीला दाणादाण उडाली. पण मधल्या फळीतील लखनऊचा धडाकेबाज फलंदाज निकोलस पूरनने ईडन गार्डन मैदान गाजवलं. कारण लखनऊचे टॉप ऑर्डरचे फलंदाज स्वस्तात माघारी परतल्यानंतर पूरनने चौफेर फटकेबाजी केली अन् ३० चेंडूत ५ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीनं ५८ धावांची अर्धशतकी खेळी साकारली.

परंतु, कोलकाताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर एक जबरदस्त रोमांचा पाहायला मिळाला. कारण पूरनने सलग दोन षटकार मारल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर शार्दूलने पूरनला फसवलं. कारण शार्दूलने फेकलेल्या उसळत्या चेंडूवर पूरन झेलबाद झाला आणि धावांचा झंझावात थांबला. शार्दूलच्या भेदक गोलंदाजीचा व्हिडीओ इंडियन प्रीमियर लीगच्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

IPL 2024 Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
CSK vs LSG सामन्यानंतर IPL कडून दोन्ही संघांच्या कर्णधारांवर कारवाई, ऋतुराज-राहुलला १२ लाखांचा दंड
IPL 2024 Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Highlights Match in Marathi
LSG vs CSK Highlights, IPL 2024 : लखनऊचा चेन्नईवर ८ विकेट्सनी दणदणीत विजय, राहुल-डी कॉकने झळकावले अर्धशतक
IPL 2024 Chennai Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: SRH चे फलंदाज ठरले फेल पण २० वर्षाच्या तरुणतुर्क शिलेदाराने सावरला संघाचा डाव, कोण आहे हा नितीश रेड्डी?
CSK vs KKR Live Cricket Score Updates in Marathi
IPL 2024 CSK vs KKR: चेन्नईने रोखला केकेआरचा विजयरथ, ऋतुराज-जडेजाची शानदार कामगिरी

नक्की वाचा – CSK vs DC: वॉर्नरने बॅटने तलवारबाजी करत जडेजाची उडवली खिल्ली, ‘त्या’ चेंडूवर वॉर्नर कसाबसा वाचला, पाहा Video

लखनऊसाठी सलामीला उतरलेला करन शर्मा स्वस्तात माघारी परतला. शर्मा ३ धावांवर असताना हर्षीत राणाच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर क्विंटन डीकॉक आणि प्रेरक मंकडने सावध खेळी करत धावसंख्येचा आलेख वाढवला. परंतु, डीकॉक २८ धावांवर असताना वरुण चक्रवर्तीच्या फिरकीचा शिकार झाला. त्यानंतर प्रेरकही २६ धावांवर वैभव अरोराच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.विशेष म्हणजे लखनऊचा धडाकेबाज फलंदाज मार्कस स्टॉयनिसला या सामन्यात धावांचा सूर गवसला नाही. स्टॉयनिस वैभव अरोराच्या गोलंदाजीवर शून्यावर बाद झाला.