एपी, बुडापेस्ट

युरो चषक फुटबॉल स्पर्धेचा हंगाम आता साखळी फेरीतील अखेरच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. बुधवारी मध्यरात्री होणाऱ्या ‘फ’ गटातील शेवटच्या सामन्यात फ्रान्स विरुद्ध पोर्तुगाल हे दोन बलाढय़ संघ एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार असल्याने मातब्बर खेळाडूंमधील द्वंद्व पाहायला मिळणार आहे.

gukesh d creates history becomes youngest Player to win fide candidates title zws
गुकेशला ऐतिहासिक जेतेपद; नामांकितांना मागे सोडत ‘कँडिडेट्स’मध्ये अजिंक्य; जगज्जेतेपदाच्या लढतीसाठी पात्र
Bernd Holzenbein dead at 78
माजी फुटबॉलपटू होल्झेनबाइन यांचे निधन
Champions League Football Barcelona beat Paris Saint Germain sport news
चॅम्पियन्स लीग फुटबॉल: बार्सिलोनाची पॅरिस सेंट-जर्मेनवर मात
Real Madrid and Manchester City draw match
चॅम्पियन्स लीग फुटबॉल : रेयाल-मँचेस्टर सिटीतील रंगतदार लढत बरोबरीत

‘फिफा’ विश्वचषक विजेत्या फ्रान्सचा संघ सध्या स्पर्धेतील सर्वाधिक खडतर गट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘फ’ गटात अग्रस्थानी विराजमान असून त्यांनी दोन सामन्यांत एक विजय, तर एक बरोबरी पत्करली आहे. दुसरीकडे हंगेरीला नमवून स्पर्धेचा दणक्यात प्रारंभ करणाऱ्या पोर्तुगालला जर्मनीविरुद्ध दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे दोन सामन्यांतून तीन गुणांसह ते गटात तिसऱ्या स्थानी आहेत. गेल्या म्हणजेच २०१६च्या युरो चषकात फ्रान्स विरुद्ध पोर्तुगाल यांच्यातच अंतिम फेरी रंगली होती. यामध्ये पोर्तुगालने १-० असा विजय मिळवला. त्यामुळे यंदा फ्रान्स त्या पराभवाची परतफेड करणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो (दोन सामन्यांत तीन गोल) सर्वोत्तम लयीत असून त्याला सहकाऱ्यांकडून पुरेशी साथ मिळणे गरजेचे आहे. फ्रान्सच्या संघात मात्र किलियान एम्बापे, करिम बेन्झेमा, अ‍ॅन्टोइन ग्रीझमन, पॉल पोग्बा आणि एन्गोलो कान्टे यांसारख्या एकापेक्षा एक सरस खेळाडूंचा भरणा असल्यामुळे कागदावर त्यांचेच पारडे जड वाटत आहे.

बुधवारी मध्यरात्रीच जर्मनी आणि हंगेरी लढत रंगणार असून या सामन्यातील निकालावर फ्रान्स-पोर्तुगालच्या खेळाडूंचेही लक्ष असणार आहे.

अंतिम फेरीसाठी ६५ हजार प्रेक्षक?

लंडन : युरो चषकाच्या प्रतिष्ठित वेम्बले स्टेडियमवर होणाऱ्या उपांत्य आणि अंतिम सामन्यासाठी तब्बल ६५ हजार प्रेक्षकांना प्रवेश देण्यात येण्याची शक्यता आहे. याविषयी लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येईल. साखळी सामन्यांसाठी वेम्बलेवर ४० हजारे चाहत्यांना प्रवेश देण्यात येत आहे. ६ आणि ७ जुलै रोजी उपांत्य, तर ११ जुलै रोजी युरो चषकाचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. वेम्बले स्टेडियमची प्रेक्षक क्षमता ९० हजार इतकी असून लंडनमधील वाढत्या करोना रुग्णसंख्येमुळे अंतिम फेरी अन्य ठिकाणी खेळवण्यात यावी, अशी मागणी काही चाहत्यांनी केली आहे.

२७ फ्रान्स-पोर्तुगाल यांच्यात आतापर्यंत झालेल्या २७ सामन्यांपैकी फ्रान्सने तब्बल

१९ लढती जिंकल्या आहेत, तर पोर्तुगालला सहा सामने जिंकता आले आहेत. बाद फेरीचे समीकरण

* फ्रान्सने ही लढत जिंकली किंवा बरोबरी साधली, तरी त्यांचे बाद फेरीतील स्थान पक्के होईल. मात्र पराभव त्यांच्यासाठी घातक ठरेल.

* पोर्तुगालने हा सामना ०-१ यापेक्षा अधिक फरकाने गमावला आणि हंगेरीने जर्मनीला २-० असा पराभवाचा धक्का दिला तर त्यांचे आव्हान संपुष्टात येईल.

* जर्मनीने हंगेरीला नमवले आणि पोर्तुगालने फ्रान्सला बरोबरीत रोखले, तर जर्मनी थेट अग्रस्थानासह बाद फेरी गाठू शकते.

स्पेन, पोलंडची कसोटी

युरो चषकातील ‘ई’ गटात समावेश असलेल्या स्पेन आणि पोलंड या दोन बलाढय़ संघांसाठी बुधवारी बाद फेरी गाठण्याची अखेरची संधी असेल. बुधवारी रात्री ९.३० वाजता होणाऱ्या दोन सामन्यांत अनुक्रमे स्पेन वि. स्लोव्हाकिया आणि पोलंड वि. स्वीडन आमनेसामने येतील. स्वीडन सर्वाधिक चार गुणांसह या गटात अग्रस्थानी असून स्लोव्हाकिया तीन गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे.