भारताच्या मानवजीत संधूने आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक पटकावले. त्याने १३८ गुणांची कमाई केली. १३५ गुणांसह जपानच्या ओयामा शिगेटकाने रौप्य तर १३४ गुणांसह कुवैतच्या मेक्यूलँड नासेरने रौप्यपदकाची कमाई केली. सांघिक प्रकारातही भारताने सुवर्णपदकावर नाव कोरले. मानवजीत संधू (११७), पृथ्वीराज (११२) आणि अनिरुद्ध सिंग (१०९) यांनी शानदार कामगिरी करत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. महाराजा यदाविंदर सिंग स्मृती भारतीय खुल्या शॉटगन अजिंक्यपद स्पर्धेत मानवजीतने १४० गुणांसह सुवर्णपदकावर कब्जा केला होता.