आठवणीत राहण्यासारखी शतके, भेदक गोलंदाजी, अनोखे झेलबाद आणि क्षेत्ररक्षणाचे काही उत्कृष्ट नमुने या गोष्टी क्रिकेट विश्वात घडत असतात. त्याची काही उत्तम उदाहरणे किंवा एखादी अविस्मरणीय खेळी आपल्या लक्षात राहीलेली असते. मग, फक्त आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्येच अशा अनोख्या घटना होत असतील असेही नाही. स्थानिक पातळीवरील सामन्यांमध्येही चिरंतर लक्षात राहतील असे क्षण घडत असतात.
अशाच स्थानिक पातळीवर ऑस्ट्रेलियात खेळविण्यात येणाऱया ‘बीबीएल’ या टी-२० मालिकेतील एका सामन्यात पोलार्डने अनोखा ‘रन-आउट’ टीपला. कॅरेबियन खेळाडू केरॉन पोलार्ड गोलंदाजी करत होता. त्याने चेंडू फेकला असता, फलंदाजाने फटका लगावताच पोलार्डने चेंडू अडविण्याच्या प्रयत्नात धाव घेतली आणि पोलार्डच्या हाताला स्पर्श करून अगदी दोन पायांच्या मधून चेंडू समोरील त्रिफळेवर जाऊन आदळला. त्यामुळे धाव घेण्यासाठी सरसारवलेला विरुद्ध बाजूचा फलंदाज(नॉन-स्ट्राईकर) धावचीत झाला.