आगामी हंगामातील रणजी ट्रॉफीच्या नॉकआउट सामन्यांदरम्यान मर्यादित ‘डीआरएस’ लागू करण्याचे बीसीसीआयने जवळपास निश्चित केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आगामी हंगामात मर्यादित डीआरएसचा अंतिम निर्णय घेण्यासाठी प्रशासकीय समितीची नेमणूकही केली आहे.या निर्णयामागे देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांचा दर्जा अधिक सुधारण्याचा बीसीसीआयचा उद्देश आहे.

२०१८-१९ च्या हंगामादरम्यान पाहिले गेलेले पंचांचे निर्णय आणि काही चुकांमुळे हा नियम लागू करण्याच्या निर्णय घेण्यात आला. एका उपांत्य सामन्यात जेव्हा सौराष्ट्र संघाकडून चेतेश्वर पुजारा कर्नाटक विरोधात फलंदाजी करत होता, तेव्हा त्याला एकदा नाहीतर दोनदा चुकीच्या निर्णय देत नाबाद ठरवण्यात आले होते. शेवटी पुजाराने या सामन्यात १३१ धावा करत कर्नाटकला रणजी करंडक स्पर्धेतून बाद केले होते.

स्थानिक पातळीवरील सामन्यांमधील पंचांच्या निर्णयांबाबत मागिल काही काळात सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहे. त्यामुळे आता या स्पर्धांमध्ये डीआरएसचा वापर हा स्वागतहार्य आहे.