ईडन गार्डन्सवर मानहानीकारक पराभव झाल्याने भारतीय संघ मालिकेत १-२ असा पिछाडीवर आहे. या सामन्यात भारताला सात विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला आणि यासाठी भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने फलंदाजांना जबाबदार धरले आहे.
जिंकण्यासाठी गोलंदाजांना यापेक्षा जास्त धावा द्यायला हव्या होत्या, सातत्याने तिनशे धावांपेक्षा अधिक धावा आम्हाला करता आलेल्या नाही. या खेळपट्टीवर ४५० पेक्षा अधिक धावा व्हायला हव्या होत्या. दुसऱ्या डावात विकेट्सची होणारी पडझड आम्ही थांबवू शकलो नाही. ज्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली त्यांना मोठी खेळी साकारता आली नाही. इंग्लंडने आमच्यापेक्षा चांगला खेळ केला आणि ते हा सामना जिंकले. त्यांनी अचूक गोलंदाजीबरोबर चांगले क्षेत्ररक्षण केले. नागपूर कसोटीमध्ये आम्ही सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करू, असे धोनीने सामन्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.    
‘‘झहीरला वगळणार, हे मला अपेक्षितच होते. पण युवराज सिंग आणि हरभजन सिंग या दोघांनाही बळीचे बकरे बनविण्यात आले आहे. हरभजनने मुंबईत २१ षटकांत २ बळी घेतले. भारत मुंबईत हरला तो सांघिक कामगिरीमधील अपयशामुळे. युवराजचीही सरासरी ३०पर्यंत आहे. जर तुम्ही युवराज आणि हरभजनला लक्ष्य करीत असाल तर अन्य खेळाडूंचीही कामगिरी समाधानकारक नाही. त्यांनाही वगळण्यात यावे.’’
सुनील गावस्कर,भारताचे माजी कर्णधार