इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यांत भारताचा मायदेशातचं दारूण पराभव झाल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला कर्णधार पदावरून हटवण्याची जोरदार मागणी होत आहे. मात्र, माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड याने धोनीचं भारतीय संघाला पुढे नेऊ शकतो असे वक्तव्य केले आहे. “माझ्या मते सध्या भारतीय संघात धोनीची जागा घेणारा एकही खेळाडू नाही. धोनीची इच्छाशक्ती आणि उत्साह पाहता तोच पुन्हा एकदा भारतीय संघाला क्रिकेटमध्ये अग्रस्थानी आणू शकतो त्याच्यातील हे गुण महत्वाचे आहेत. भावनेच्या भरात अनेक माजी क्रिकेटपटू धोनीने कर्णधारपद सोडण्याचे वक्तव्य करत आहेत. पण सध्याची भारतीय संघाची स्थिती पाहता धोनीचं भारतीय संघाला सावरू शकतो, असे वाटतेअसे प्रांजळमत राहुल द्रविड याने स्पष्ट केले आहे. धोनीच्या कर्णधारपदाच्या या कसोटी मालिकेच्या कारकिर्दीत भारतीय संघाला १-२ने पराभव स्विकारावा लागला यावर टिका करत माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर, के. श्रीकांत यांनी धोनीला कर्णधारपदावरून काढून टाकण्याचे वक्तव्य केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: M s dhoni can be the man to take india forward rahul dravid
First published on: 18-12-2012 at 05:33 IST