अमेरिकेची स्टार टेनिसपटू सेरेना विल्यम्सने निवृत्त होत असल्याचे सूतोवाच केले आहे. विल्यम्सने लवकरच संन्यास घेणार असल्याचे सांगितल्यानंतर जभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. दरम्यान रशियाची माजी टेनिसपटू मारिया शारापोवाने सेरेनाला तिने लगेच संन्यास घेऊ नये, असा सल्ला वर्षभरापूर्वीच दिला होता. याबाबतची माहिती खुद्द मारिया शारापोवाने दिली आहे.

हेही वाचा >>> PAK vs SL Asia Cup 2022 : पाकिस्तानने सामना गमावला, पण खेळाडूंच्या करामतीची होतेय चर्चा; झेल टिपल्यानंतर मैदानातच…

मारिया शारापोवाने सेरेना विल्यम्सला आताच निवृत्ती घेऊ नको असा सल्ला वर्षभरापूर्वीच दिला होता. मागील वर्षी मेट गाला समारोहामध्ये मारिया शारापोवा आणि सेरेना विल्यम्स यांची भेट झाली होती. याच भेटीबद्दल शारापोवाने अधिक माहिती दिली आहे. “आम्ही मागील वर्षी एकमेकांना भेटलो. या भेटीमध्ये आमच्यात निवृत्तीबद्दल चर्चा झाली. त्यावेळी मी आज जे खेळाडू आहेत, त्यांच्यापेक्षा तू उत्तम खेळतेस. त्यामुळे तू टेनिस कोर्टमध्ये जायला हवं, असं विल्यम्सला सांगितले होते,” असे मारिया शारापोवाने सांगितले आहे.

हेही वाचा >>> मराठमोळ्या भावनाने केले जागतिक अजिंक्यपदाचे ‘पॉवरलिफ्टिंग’

दरम्यान, २०२१ साली सेरेना विल्यम्सच्या पायाला दुखापत झाली होती. या दुखापतीतून सावरल्यानंतर सेरेनाने २०२२ साली विम्बल्डन स्पर्धेच्या माध्यमातून टेनिस कोर्टवर पुनरागमन केले होते. मात्र या स्पर्धेत ती पहिल्याच फेरीमध्ये बाद झाली. सेरेना विल्यम्स ही आघाडीची टेनिसपटू आहे. तिने आपल्या तीन दशकांच्या कारकिर्दीत तब्बल २३ ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावलेले आहेत. अनेक वर्षे तिचे टेनिसवर एकहाती वर्चस्व होते.