ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्क सलग चौथ्यांदा प्रतिष्ठेच्या अ‍ॅलन बॉर्डर पुरस्काराचा मानकरी ठरला. मेलबर्न येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात वर्षांतील अ‍ॅलन बॉर्डर पुरस्कार अर्थात सवरेत्कृष्ट क्रिकेटपटूच्या पुरस्काराने क्लार्कला गौरवण्यात आले. माइक हसी आणि शेन वॉटसन यांना मागे टाकत क्लार्कने हा पुरस्कार पटकावला. क्लार्कला १९८ मते मिळाली. हसी आणि वॉटसन यांना प्रत्येकी १६५ मते मिळाली. क्लार्कने कसोटीतील सवरेत्कृष्ट खेळाडूचा मानही पटकावला. २५ फेब्रुवारी २०१२ ते जानेवारी २०१३ कालावधीदरम्यान क्लार्कने ९ कसोटीत ७७.१४च्या सरासरीने १,०८० धावा केल्या. क्लार्कने सलग दुसऱ्यांदा या पुरस्काराचा मानकरी ठरला. अष्टपैलू शेन वॉटसनने सवरेत्कृष्ट ट्वेन्टी-२० खेळाडूचा, तर वेगवान गोलंदाज क्लिंट मॅके याने सवरेत्कृष्ट एकदिवसीय क्रिकेटपटूचा पुरस्कार पटकावला. स्थानिक क्रिकेटमधील सवरेत्कृष्ट खेळाडू म्हणून फिलीप ह्यूजची, तर जो बर्न्‍सची ब्रॅडमन युवा क्रिकेटपटू पुरस्कारासाठी निवड झाली.