राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा : मित्तल, दर्शना यांची आघाडी कायम

आदित्य मित्तल व एम.एस.दर्शना यांनी सात वर्षांखालील गटाच्या २७ व्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेतील नवव्या फेरीअखेर आघाडी कायम राखली आहे. ही स्पर्धा पुणे जिल्हा चेस सर्कलने आयोजित केली आहे. नवव्या फेरीत मित्तल याचे साडेआठ गुण झाले आहेत. त्याने गोव्याच्या लिऑन मेंडोसा (७) याचा केवळ ३५ चालींमध्ये पराभव केला.

आदित्य मित्तल व एम.एस.दर्शना यांनी सात वर्षांखालील गटाच्या २७ व्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेतील नवव्या फेरीअखेर आघाडी कायम राखली आहे. ही स्पर्धा पुणे जिल्हा चेस सर्कलने आयोजित केली आहे.
नवव्या फेरीत मित्तल याचे साडेआठ गुण झाले आहेत. त्याने गोव्याच्या लिऑन मेंडोसा (७) याचा केवळ ३५ चालींमध्ये पराभव केला. पश्चिम बंगालचा आर्य भक्ता व आसामचा साहिल डे यांचे प्रत्येकी साडेसात गुण झाले आहेत. आर्य याने आदित्य सामंत (७) या महाराष्ट्राच्या खेळाडूला पराभूत केले तर साहिल याने महाराष्ट्राच्याच वरद आठल्ये (६) याच्यावर मात केली. मेंडोसा व सामंत यांच्याबरोबरच उत्तर प्रदेशचा आर्यनसिंग व तामिळनाडूचा एल.सम्यक यांचेही सात गुण झाले आहेत. त्याने महाराष्ट्राच्या देव शहा याचा पराभव केला.
मुलींमध्ये दर्शना हिने प्रेक्षणीय कामगिरीची मालिका सुरू ठेवताना आपलीच सहकारी बी.अश्वथा हिचा पराभव केला. महाराष्ट्राच्या संस्कृती वानखेडे हिने साडेसात गुणांसह दुसरे स्थान घेतले आहे. तिला कामया नेगी या दिल्लीच्या खेळाडूविरुद्ध बरोबरी स्वीकारावी लागली. अश्वथा तसेच महाराष्ट्राची तनिषा बोरामणीकर व कर्नाटकची भाग्यश्री पाटील यांचे प्रत्येकी सात गुण झाले आहेत. त्या तिसऱ्या क्रमांकावर आहेत. नेगी, कीर्ति पटेल, आदिश्री नायक यांचे प्रत्येकी साडेसहा गुण झाले आहेत. त्यांनी संयुक्तपणे चौथे स्थान घेतले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mittal darshana take lead in national chess tournament