कॅप्टन कूल म्हणून ओळख असलेल्या महेंद्रसिंग धोनीने आपल्या क्रिकेटमधील कारकिर्दीबाबतचा एक अतिशय महत्त्वाचा खुलासा केला आहे. अतिशय संयमी आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार म्हणून उत्तम कामगिरी करणारा खेळाडू म्हणून आपल्याला त्याची ओळख आहे. मात्र आपण कर्णधारपद सोडण्यामागे नेमके काय कारण होते याचा खुलासा धोनीने केला आहे. २०१९ मध्ये होणाऱ्या आसीसी क्रिकेट विश्वचषकाच्या स्पर्धेसाठी नवीन कर्णधाराला संघ उभा करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी मी हा निर्णय घेतला असेही धोनी म्हणाला. रांची येथील विमानतळावर केंद्रिय औद्योगिक सुरक्षा दलातर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलताना त्याने हा खुलासा केला.

योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय असेही त्याने आपल्या या कर्णधारपद सोडण्याचे समर्थन केले. त्यामुळे आता भारतीय संघाचा कर्णधार असलेल्या विराट कोहली याच्यासाठी ही अतिशय जमेची बाजू आहे असेच म्हणावे लागेल. कोहली आणि एम.एस धोनी यांचे अतिशय चांगले संबंध असून कोहलीने अनेकदा धोनीचा मार्गदर्शक म्हणूनही उल्लेख केला आहे. २०११ मध्ये भारताला विश्वचषक मिळवून देणाऱ्या संघाचे धोनीने नेतृत्त्व केले होते ही त्याच्या कर्णधार पदाच्या काळातील सर्वोत्तम घटना समजली जाते. खेळ कोणताही असो कुठे थांबावं हे प्रत्येक खेळाडूला कळलं पाहिजे असं म्हणतात. मध्यंतरीच्या काळात कसोटी सामन्यात पराभव स्विकारावा लागल्यानंतर धोनीने, आता हीच ती थांबायची वेळ असं म्हणत कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली. तर मागील वर्षी मर्यादित षटकांच्या सामन्याचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. मूळात आपल्यानंतर येणाऱ्या कर्णधाराला संघ बांधणीसाठी पुरेसा वेळ देणारा एम.एस धोनीसारखी कर्णधार निराळाच