सततच्या आर्थिक चणचणीमुळे कामकाज कोलमडण्याची शक्यता राष्ट्रीय नेमबाजी संघटनेने व्यक्त केली आहे. रायफल आणि पिस्तुल नेमबाजांसाठी संघटनेने निवड चाचणी आयोजित केली होती. या चाचणीसाठीच्या शुल्कामध्ये संघटनेने मोठय़ा प्रमाणावर वाढ केली. नेमबाजपटूंनी संघटनेला पत्र लिहित या प्रकाराने धक्का बसल्याचे सांगितले. नेमबाजांच्या प्रखर विरोधामुळे संघटनेच्या तांत्रिक समितीने ही शुल्कवाढ कमी केली. आम्ही ही शुल्कवाढ कमी केली आहे. परंतु संघटनेला आर्थिक चणचण भेडसावत आहे. आम्ही नुकसान का सहन करायचे? या प्रकारामुळे आमचा आर्थिक डोलारा कोलमडणार असल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले.