Naveen Ul Haq Instagram Story Angry Reaction: भारतात चालू असलेल्या पुरुष क्रिकेट विश्वचषकात अफगाणिस्तानचा संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. अफगाणिस्तानच्या गाठीशी न्यूझीलंड आणि पाकिस्तान इतकेच गुण आहेत मात्र अफगाणिस्तान दोन्ही संघांच्या तुलनेत एक सामना कमी खेळला असल्याने अजूनही टॉप ४ मध्ये जाण्यासाठी त्यांना प्रयत्न करण्याची पुरेपूर संधी आहे. अफगाणिस्तान उद्या म्हणजेच मंगळवारी वानखेडेवर ऑस्ट्रेलियन संघाचा सामना करणार आहे. ऑस्ट्रेलियाला अत्यंत संथ सुरुवातीनंतर आता स्पर्धेत लय गवसली आहे ज्यानंतर त्यांनी सलग पाच सामने जिंकले आहेत आणि कट्टर प्रतिस्पर्धी इंग्लंडवर ३३धावांनी विजय मिळवला आहे.

ऑस्ट्रेलिया व अफगाणिस्तानच्या सामन्यापूर्वी वेगवान गोलंदाज नवीन उल हकने काही जुन्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रयत्न करत ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघावर शाब्दिक हल्ला चढवला आहे. आयपीएल २०२३ मध्ये कोहलीशी पंगा घेतलेला नवीन नेहमीच आपल्या बोल्ड वक्तव्य व वागणुकीसाठी चर्चेत असतो. याच शैलीत आता त्याने ऑस्ट्रेलियाला सुद्धा सुनावले आहे.

Axar Patel on Impact Player Rule in IPL 2024
IPL 2024 : अक्षर पटेलने ‘इम्पॅक्ट प्लेयर’च्या नियमावर उपस्थित केला प्रश्न, सांगितले ‘या’ खेळाडूंसाठी का आहे धोकायदायक?
Confirmed Rohit Sharma does not stay with Mumbai Indians team in Mumbai
रोहित शर्माने सांगितलं मुंबई इंडियन्सच्या संघासह न राहण्याचं कारण; म्हणाला, “आता माझ्या हातात तर..”
Rr Vs Gt Ipl 2024 Sanju Samson 50th Match As Captain
RR vs GT : संजू सॅमसनने ५०व्या सामन्यात केला खास पराक्रम, ‘या’ बाबतीत रोहित शर्मासह तीन कर्णधारांना टाकले मागे
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव

नवीनने इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करून ऑस्ट्रेलियाचा समाचार घेतला. क्रिकेट प्रेमींच्या लक्षात असेल की, मार्चमध्ये यूएईमध्ये होणार्‍या दोन्ही पक्षांमधील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यापासून ऑसीजने माघार घेतली होती. अफगाणिस्तानमध्ये ‘महिलांना शिक्षण व नोकरीवरील निर्बंध, पार्क आणि जिममध्ये प्रवेश नाकारणे व तालिबानसारख्या कट्टर हुकूमशाहीचा विरोध म्हणून हा निर्णय घेत असल्याचे ऑस्ट्रेलियाने सांगितले होते. ही मालिका आयसीसी सुपर लीगचा भाग होती, जी चालू विश्वचषकासाठी पात्र होण्याचा एक मार्ग होती मात्र ऑस्ट्रेलियाने खेळण्यास नकार दिल्याने अफगाणिस्तानचे काही प्रमाणात नुकसान झाले होते.

याचीच आठवण करून देत नवीनने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला होता. “द्विपक्षीय मालिका खेळण्यास नकार दिलेला क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा संघ विश्वचषकात आता काय करणार हे पाहणं रंजक असेल. तत्व, मानवी हक्क की दोन पॉईंट्स ( #standards #humanrights or 2 points)

नवीन उल हक इंस्टाग्राम स्टोरी

हे ही वाचा << शतकवीर विराट कोहलीची ग्राउंड स्टाफला सुंदर भेट; IND vs SA सामन्यातील ‘हा’ Video पाहून भारावले फॅन्स

दरम्यान नवीन उल हक हा ऑस्ट्रेलियाच्या निर्णयाचा निषेध करणारा एकटाच नव्हता. अफगाणिस्तानचा आघाडीचा फिरकी गोलंदाज रशीद खान याने सुद्धा यावरून संताप व्यक्त करत म्हटले होते की, “ऑस्ट्रेलियाने मार्चमध्ये आमच्याविरुद्ध खेळण्यास नकार देत मालिकेतून माघार घेतल्याचे ऐकून मी खरोखर निराश झालो होतो . माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करताना मला खूप अभिमान वाटतो आणि आम्ही जागतिक स्तरावर खूप प्रगती केली आहे. क्रिकेटला राजकारणापासून दूर ठेवायला हवे.”