पीटीआय, चेन्नई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटचा सराव आणि सामन्यांमध्ये खेळल्यामुळे शरीरावर ताण पडत असला, तरी निवृत्तीबाबतचा निर्णय आपण इतक्यातच घेणार नसून विचार करण्यासाठी आठ-नऊ महिन्यांचा कालावधी असल्याचे चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी म्हणाला.

धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई संघाने मंगळवारी झालेल्या ‘क्वालिफायर-१’च्या सामन्यात गुजरात टायटन्सवर १५ धावांनी मात करत ‘आयपीएल’च्या अंतिम फेरीत प्रवेश केला. रविवारी होणारा अंतिम सामना धोनीच्या कारकीर्दीतील अखेरचा सामना असू शकेल असे म्हटले जात आहे. मात्र, तूर्त आपण निवृत्तीचा निर्णय घेतला नसल्याचे धोनीने स्पष्ट केले. ‘‘या स्पर्धेत खेळल्याने माझ्या शरीरावर नक्कीच ताण पडतो आहे. मी चार महिने घरापासून दूर आहे. त्यामुळे भविष्यात मी इतका वेळ घराबाहेर राहणे पसंत करेन का, हे आताच सांगणे अवघड आहे,’’ असे धोनी म्हणाला.

Hardik Pandya Slapped With Fine Of 12 Lakh rupees By BCCI
मुंबई इंडियन्सचा विजय सेलिब्रेट करताना हार्दिक पंड्याला धक्का; ‘या’ साठी बीसीसीआयने ठोठावला १२ लाखांचा दंड
kl rahul
IPL 2024 : लखनऊसमोर आज चेन्नईचे आव्हान
Lucknow beat Gujarat by 33 runs in IPL 2024
LSG vs GT : लखनऊविरुद्धच्या पराभवानंतर शुबमन गिल संतापला; कोणावर फोडले खापर? घ्या जाणून
Mohit Sharma on Ravi Shastri's Comment
GT vs SRH : वयांवरुन खिल्ली उडवणाऱ्या रवी शास्त्रींना मोहित शर्माचे चोख प्रत्युत्तर; म्हणाला, ‘माझं वय वाढतंय…’

‘‘मी ३१ जानेवारीला घराबाहेर पडलो, माझे दुसरे काम संपवले आणि २ किंवा ३ मार्चपासून सरावाला सुरुवात केली. ‘आयपीएल’सारख्या स्पर्धेची तयारी करताना खूप मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे पुढे काय होईल हे आता सांगू शकत नाही. (निवृत्तीबाबत) निर्णय घेण्यासाठी माझ्याकडे आठ-नऊ महिन्यांचा कालावधी आहे. मी आताच याचा ताण घेणार नाही. पुढील हंगामासाठीची खेळाडू लिलावप्रक्रिया डिसेंबरमध्ये पार पडेल. तोपर्यंत विचार करण्यासाठी माझ्याकडे वेळ आहे,’’ असे ४१ वर्षीय धोनीने सांगितले. यंदाच्या स्पर्धेत खेळताना धोनीच्या गुडघ्याला दुखापत झाली. मात्र, त्यानंतरही तो एकाही सामन्याला मुकलेला नाही. ‘‘चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी मी कायम उपलब्ध असेन, मग ते खेळाडू म्हणून असो किंवा अन्य एखाद्या भूमिकेत. मी आता काहीही स्पष्टपणे सांगू शकत नाही,’’ असे धोनी म्हणाला.

धोनीने मुद्दाम वेळ वाया घालवला?

‘क्वालिफायर-१’च्या सामन्यात चेन्नईने गुजरातसमोर १७३ धावांचे आव्हान ठेवले होते. याचा पाठलाग करताना गुजरातला अखेरच्या पाच षटकांत ७१ धावांची आवश्यकता होती. त्यावेळी गुजरातच्या डावातील १६वे षटक वेगवान गोलंदाज मथीश पाथिरानाला देण्याची धोनीची योजना होती. मात्र, पाथिराना त्यापूर्वी थोडा वेळ मैदानाबाहेर होता. नियमानुसार, गोलंदाज जितका वेळ मैदानाबाहेर होता, तितकाच वेळ त्याला पुन्हा मैदानावर घालवावा लागतो. त्यानंतरच त्याला गोलंदाजीची परवानगी असते. पाथिराना साधारण चार मिनिटे मैदानाबाहेर होता आणि मैदानावर परत येऊन त्याने त्वरित चेंडू हाती घेतला. त्यामुळे पंचांनी त्याला गोलंदाजी करण्यापासून रोखले. परंतु त्यावेळी धोनीने पंचांशी संवाद साधला. चेन्नईचे अन्य काही खेळाडूही पंचांशी चर्चा करण्यासाठी आले. यात काही मिनिटे वाया गेली आणि पाथिरानाला पुन्हा मैदानावर येऊन आवश्यक तितकी मिनिटे झाल्याने गोलंदाजी करण्याची परवानगी मिळाली. त्यामुळे धोनीने मुद्दाम वेळ घालवल्याची टीका समाजमाध्यमावर करण्यात आली. ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू ब्रॅड हॉगनेही धोनी व विशेषत: पंचांवर टीका केली.