Australia Squad for World Cup 2023: आगामी एकदिवसीय विश्वचषकाच्या सुमारे दोन महिने आधी, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मार्की स्पर्धेसाठी १८ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. विश्वचषकासाठी एका संघात जास्तीत जास्त १५ खेळाडू असतील. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या म्हणण्यानुसार, या १८ खेळाडूंमधून १५ खेळाडूंची निवड केली जाईल आणि उर्वरित खेळाडूंना राखीव ठेवण्यात येईल.

लाबुशेनला दाखवला बाहेरचा रस्ता

ऑस्ट्रेलियाने मार्चमध्ये भारतात शेवटची वन डे खेळली होती. त्यावेळी ऑस्ट्रेलियन संघात मार्नस लाबुशेनचाही समावेश होता. मात्र, विश्वचषकासाठी निवडलेल्या संघात लाबुशेनचे नाव नाही. म्हणजेच विश्वचषक योजनेतून आणि संघातून त्याला वगळण्यात आले आहे. कसोटीत चांगली सरासरी असलेल्या लाबुशेनची वन डेत चांगली कामगिरी झालेली नाही. आतापर्यंत ३० एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने ३१.३७च्या सरासरीने ८४७ धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि सहा अर्धशतकांचा समावेश आहे.

Jake Fraser-McGurk
आयपीएलमध्ये धूमशान घालणाऱ्या बॅट्समनला वर्ल्डकप संघात स्थान नाही; दिग्गज खेळाडूला नारळ
South Africa squad announced for T20 World Cup 2024
T20 WC 2024 : विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर! IPL मध्ये डंका वाजवणाऱ्या ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी
Irfan Pathan Picks 15 Man Squad
Team India : इरफान पठाणने टी-२० विश्वचषकासाठी १५ खेळाडूंची केली निवड, हार्दिक पंड्यासमोर ठेवली ‘ही’ अट
Along with Wanderers Kingsmead Newlands will host 2027 World Cup matches sport news
वॉण्डरर्ससह किंग्जमीड, न्यूलॅण्ड्सला २०२७च्या विश्वचषकाचे सामने

हेझलवुड आणि कमिन्सचे संघात पुनरागमन

कमिन्स वैयक्तिक कारणांमुळे भारतीय दौऱ्यावर खेळला नाही. त्याचे विश्वचषक संघात पुनरागमनही झाले आहे. याशिवाय वेगवान गोलंदाज जोश हेझलवुडनेही पुनरागमन केले आहे. ऑस्ट्रेलियाला विश्वचषकापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि नंतर भारताविरुद्ध वन डे मालिका खेळायची आहे. हा संघ या दोघांविरुद्धच्या मालिकेत खेळणार असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटले आहे.

कमिन्सच्या मनगटाची दुखापत

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिलेल्या माहितीनुसार, अ‍ॅशेसच्या शेवटच्या कसोटीत कर्णधार कमिन्सच्या मनगटाची दुखापत झाली होती. त्याचे मनगट तुटले आहे, ज्यामुळे तो पुढील सहा आठवडे खेळापासून दूर राहील. मात्र, तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेनंतर भारताविरुद्धच्या वन डे मालिकेत पुनरागमन करेल. ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिका दौरा ३० ऑगस्टपासून सुरू होणार आहे.

या दौऱ्यात तीन सामन्यांची टी२० मालिका आणि त्यानंतर पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाईल. ७ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर दरम्यान एकदिवसीय सामने खेळवले जातील. या मालिकेनंतर १५ खेळाडू अंतिम होणार आहेत, जे भारत दौऱ्यावर जाणार आहेत. ऑस्ट्रेलियन संघ भारताविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे.

हेही वाचा: IND vs WI 2nd T20: निकोलस पूरनची तुफानी अर्धशतक! वेस्ट इंडीजचा भारतावर दोन विकेट्सने रोमहर्षक विजय, मालिकेत २-० आघाडी

उपकर्णधार निवडला नाही

पाहण्यासारखी गोष्ट म्हणजे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कोणत्याही उपकर्णधाराची निवड केलेली नाही. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात जोश हेझलवूड संघाचा उपकर्णधार होता. त्याच वेळी, या वर्षी मार्चमध्ये, कमिन्स आणि हेझलवुड या दोघांच्या अनुपस्थितीत, स्टीव्ह स्मिथने कर्णधारपद भूषवले होते.

सांघा आणि हार्डी सरप्राईज पॅकेज

त्याचबरोबर या संघात तनवीर सांघा आणि अ‍ॅरॉन हार्डी हे सरप्राईज पॅकेज आहेत. २१ वर्षीय संघाला मागील वर्षी पाठीचा ताण फ्रॅक्चर झाला होता, त्यामुळे तो बराच काळ संघाबाहेर होता. फेब्रुवारी २०२१ मध्ये, ऑस्ट्रेलियाच्या न्यूझीलंड दौऱ्यावर टी२० मालिकेसाठी त्याची निवड झाली.

हेही वाचा: IND vs PAK: अब आया उंट पहाड… अखेर पाकिस्तान सरकारने दिली परवानगी, बाबर आझमचा संघ WC2023 होणार सहभागी

मॅक्सवेल भारतीय दौऱ्यातून संघात सामील होणार आहे

३४ वर्षीय ग्लेन मॅक्सवेल दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर खेळणार नाही कारण तो लवकरच पिता होणार आहे. यानंतर तो भारतीय दौऱ्यातून संघात सामील होईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची वन डे मालिका २२ ते २७ सप्टेंबर दरम्यान मोहाली, इंदोर आणि राजकोट येथे खेळवली जाणार आहे. या संघात मिचेल मार्श, कॅमेरून ग्रीन, मार्कस स्टॉइनिस आणि शॉन अ‍ॅबॉट या चार अष्टपैलू खेळाडूंचा समावेश आहे.

विश्वचषकासाठी जाहीर झालेला ऑस्ट्रेलियन संघ

पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन अ‍ॅबॉट, अ‍ॅश्टन अगर, अ‍ॅलेक्स कॅरी, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, अ‍ॅरॉन हार्डी, जोश हेझलवुड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस , डेव्हिड वॉर्नर, अ‍ॅडम झाम्पा.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघ

मॅट शॉर्ट, टिम डेव्हिड्स, जेसन बेहरेनडॉर्फ, जोश इंग्लिश, मार्कस स्टॉइनिस, नॅथन एलिस, स्टीव्ह स्मिथ, मिचेल मार्श, स्पिनर जॉन्सन, ट्रॅव्हिस हेड, आरोन हार्डी, अ‍ॅडम झाम्पा, ग्लेन मॅक्सवेल, शॉन अ‍ॅबॉट.