Pakistan hockey Team Coach Shahnaz Sheikh : २०२४ ऑलिम्पिक २६ जुलै ते ११ ऑगस्ट दरम्यान पॅरिस येथे होणार आहे. पाकिस्तानचा पुरुष हॉकी संघ या मोठ्या स्पर्धेच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. एफआयएच ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या तिसऱ्या स्थानासाठी खेळल्या गेलेल्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध पराभव झाला. या पराभवानंतर पाकिस्तान पुरुष हॉकी संघाचे २०२४ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे स्वप्न भंगले आहे. आता पाकिस्तान हॉकी संघाच्या कोचने एक गंभीर आरोप केला आहे.

पाकिस्तान हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक शहनाज शेख यांनी एफआयच ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवासाठी ‘पक्षपाती’ आणि ‘खराब’ अंपायरिंगला जबाबदार धरले आहे. त्यांनी मायदेशी परतल्यावर असा दावा केला की अयोग्य अंपायरिंगमुळे पाकिस्तानचा न्यूझीलंविरुद्ध २-३ असा पराभव झाला.

mohsin nakki
लाहोर, कराची, रावळपिंडीला पसंती; चॅम्पियन्स करंडकाच्या आयोजनावर पाकिस्तान ठाम
Hardik Pandya Slapped With Fine Of 12 Lakh rupees By BCCI
मुंबई इंडियन्सचा विजय सेलिब्रेट करताना हार्दिक पंड्याला धक्का; ‘या’ साठी बीसीसीआयने ठोठावला १२ लाखांचा दंड
Mohammad Amir and Imad Wasim Returns to Pakistan National Team
फिक्सिंग, बंदी आणि निवृत्तीनंतर मोहम्मद आमिर पुन्हा पाकिस्तानच्या टी-२० संघात
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक

चॅम्पियन्स ट्रॉफी २०१४ च्या फायनलपूर्वी वरिष्ठ संघाचे प्रशिक्षकपद भूषवलेल्या शहनाज यांनी सांगितले की, टीव्ही अंपायर आणि मैदानावरील अंपायर यांनी अनेकदा चुका केल्या. ते म्हणाले, “त्यांनी दुसऱ्या क्वार्टरमध्ये न्यूझीलंडला बरोबरी साधण्याची संधी दिली आणि जेव्हा आम्ही पंचांकडून रेफरल मागितले, तेव्हा त्यांनी सांगितले की गोल झाला. त्या विशिष्ट ठिकाणी कॅमेरा नव्हता, त्यामुळे टीव्ही अंपायरकडे जाण्याला काही अर्थ नव्हता.”

हेही वाचा – BCCI Awards : चार वर्षानंतर होणार बीसीसीआयचा पुरस्कार सोहळा, रवी शास्त्रींसह ‘या’ खेळाडूंना केले जाणार सन्मानित

शहनाज यांनी पुढे सांगितले की, ते विरोध करण्यासाठी आणि रेफरल मागण्यासाठी तांत्रिक संचालकाकडेही गेले होते, परंतु ते न्यूझीलंडचे असल्याचे कळले. “त्यामुळे सामन्यात सहभागी असलेल्या देशातील संचालकाची तुम्ही नियुक्ती कशी करू शकता,” असा प्रश्न त्यांनी विचारला. सामन्यात पंचांकडून अनेकदा चुका झाल्या आणि त्याचे परिणाम पाकिस्तान संघाला भोगावे लागले, अशी खंतही शहनाज यांनी व्यक्त केली.

सलग तिसऱ्या ऑलिम्पिकमधून पाकिस्तान बाहेर –

पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवता न आल्याने संपूर्ण हॉकी संघ हताश आणि निराश झाला आहे. पाकिस्तान संघाला शेवटची संधी २०१२ च्या ऑलिम्पिकमध्ये मिळाली होती. त्यावेळी संघ सातव्या क्रमांकावर राहिला होता. पाकिस्तानने ऑलिम्पिकमध्ये आठ पदके जिंकली आहेत, ज्यात तीन सुवर्ण (१९६०, १९६८ आणि १९८४) आहेत.