सीमेवर झालेल्या तणावामुळे पाकिस्तानी क्रिकेट संघाचे महिला विश्वचषकातील सामने कुठे खेळवायचे हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळापुढील (बीसीसीआय) प्रश्न निकालात निघाला आहे. पाकिस्तानी क्रिकेट सामने खेळवायचा निर्णय कटक येथे झाला असल्याने साऱ्यांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
गुरुवारी बीसीसीआय आणि आयसीसी पाकिस्तानच्या संघाच्या सामन्यांबाबत विचारविनिमय करताना ओडिशा क्रिकेट असोसिएशनने सामने कटकला खेळवण्यास हरकत नसल्याचे सांगितले होते. त्यानुसार स्पर्धा संचालक सुरू नायक यांनी हे सामने कटकला खेळवण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
‘अ’ गटाचे सर्व सामने नियोजित वेळापत्रकानुसार मुंबईत होणार आहेत, तर ‘ब’ गटाचे सामने कटकला खेळवण्यात येणार असून त्याचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 19th Jan 2013 रोजी प्रकाशित
पाकिस्तानी संघाचे सामने कटकला होणार
सीमेवर झालेल्या तणावामुळे पाकिस्तानी क्रिकेट संघाचे महिला विश्वचषकातील सामने कुठे खेळवायचे हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळापुढील (बीसीसीआय) प्रश्न निकालात निघाला आहे.
First published on: 19-01-2013 at 01:47 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistans womens world cup matches shifted to cuttack