scorecardresearch

Premium

WPL 2024 Auction : मिनी लिलावात फोबी लिचफिल्ड ठरली पहिली करोडपती, गुजरात जायंट्सने एक कोटींना घेतले विकत

WPL 2024 Auction Updates : महिला प्रीमियर लीगच्या मिनी लिलावात पहिल्याच खेळाडूवर मोठी बोली लागली. त्यानंतर फोबी लिचफिल्डला गुजरात जायंट्सने एक कोटी रुपयांना विकत घेतले.

Women's Premier League 2024 Auction updates in marathi
फोबी लिचफिल्डला एक कोटीची बोली (फोटो-एक्स अॅप)

Phoebe Litchfield was bought by Gujarat Giants for Rs 1 Crore : महिला प्रीमियर लीग २०२४च्या मिनी लिलावाला धमाकेदार सुरुवात झाली. मुंबईत सुरू असलेल्या या लिलावात पहिल्याच खेळाडूवर १ कोटी रुपयांचा बोली लावण्यात आली होती. ऑस्ट्रेलियाच्या फोबी लिचफिल्डला गुजरात जायंट्सने १ कोटी रुपयांना आपल्या संघात घेतले होते. फोबीची मूळ किंमत ३० लाख रुपये ठेवण्यात आली होती. तिला विकत घेण्यासाठी यूपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात चुरशीची स्पर्धा होती. शेवटी गुजरात फ्रँचायझीने बाजी मारत आपल्या संघात सामील करुन घेतले.

फोबी लिचफिल्ड फक्त २० वर्षांची आहे. तिची फलंदाजीची शैली अतिशय आक्रमक आहे. टी-२० क्रिकेटमध्ये ती अतिशय स्फोटक पद्धतीने धावा करते. तिने आतापर्यंत केवळ ५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या सामन्यांत तिची सरासरी ४९.५० आणि स्ट्राइक रेट २२० चा राहिला आहे.

AUS vs WI 2nd Test Match Updates in marathi
AUS vs WI 2nd Test : वेस्ट इंडिजचा ऑस्ट्रेलियावर ८ धावांनी ऐतिहासिक विजय, शमर जोसेफ ठरला विजयाचा शिल्पकार
IND vs ENG 1st test match updates in marathi
IND vs ENG : ‘आधी पॅड की बॅट…’, रवींद्र जडेजाच्या एलबीडब्ल्यू आऊटवरुन निर्माण झाला गोंधळ
Kevin Sinclair cartwheel
क्रिकेटच्या मैदानावर कोलांटउड्या सेलिब्रेशन व्हायरल; वेस्ट इंडिजच्या केव्हिन सिनक्लेअरची धमाल
england allout 246
Ind vs Eng: पहिल्या दिवशी इंग्लंड बॅकफूटवर; सर्वबाद २४६, यशस्वीची दमदार सुरुवात

फोबी ही डावखुरी फलंदाज आहे. गेल्या वर्षीच तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. बरोबर एक वर्षापूर्वी, 11 डिसेंबर रोजी, तिने भारतात पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. हा सामना भारताविरुद्ध मुंबईत झाला होता. आता वर्षभरानंतर मुंबईत तिचे नशीब पुन्हा एकदा चमकले आहे.

हेही वाचा – ZIM vs IRE : सिकंदर रझा आयरिश खेळाडूंशी भिडला; लाइव्ह सामन्यात बॅट घेऊन मारायलाही धावला, पाहा VIDEO

या एका वर्षातच फोबीने वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्येही पदार्पण केले. आतापर्यंत या खेळाडूने ११ वनडे आणि एक कसोटी सामना खेळला आहे. फोबीची कसोटीत फलंदाजीची सरासरी ३४.५० आहे आणि एकदिवसीय सामन्यात तिची फलंदाजीची सरासरी ४९.१४ आहे. आतापर्यंत तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक शतक आणि तीन अर्धशतके झळकावली आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Phoebe litchfield was bought by gujarat giants for rs 1 crore in wpl 2024 auction vbm

First published on: 09-12-2023 at 16:07 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×