scorecardresearch

Premium

ZIM vs IRE : सिकंदर रझा आयरिश खेळाडूंशी भिडला; लाइव्ह सामन्यात बॅट घेऊन मारायलाही धावला, पाहा VIDEO

Sikandar Raza Fight Video : सिकंदर रझा आणि कर्टिस कॅम्फर यांच्यातील वाद इतका टोकाला पोहोचला की, ज्यामुळे रझा कॅम्फरला मारण्याचा प्रयत्न करताना दिसला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Raza vs Little & Campher Fight Video Viral
सिकंदर रझाच्या वादाचा व्हिडीओ व्हायरल (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Video of the fight between Sikandar Raza, Joshua Little and Curtis Campher : आयर्लंडचा संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. दरम्यान, गुरुवारी हरारे येथे उभय संघांमध्ये पहिला टी-२० सामना झाला, जो झिम्बाब्वेने एका विकेटने जिंकला. मात्र, या सामन्यात प्रचंड गदारोळ झाला. आयरिश खेळाडू आणि झिम्बाब्वेचा सिकंदर रझा यांच्यात लाइव्ह सामन्यात मोठा वाद झाला. या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

ही घटना १४ व्या षटकात घडली. त्यावेळी ब्रायन बेनेट रझासोबत क्रीजवर होता आणि झिम्बाब्वेला ४२ चेंडूत ५२ धावांची गरज होती. आयरिश खेळाडूंना रझाची विकेट हवी होती आणि जाणीवपूर्वक रझाला भडकवण्याचा प्रयत्न केला, असे वाटत होते. पाचव्या चेंडूवर आयरिश गोलंदाज जोशुआ लिटल रझाला काहीतरी बोलताना दिसला. यावर रझा रागावला आणि त्याने लिटलला उत्तर दिले. यानंतर लिटल गोलंदाजी करण्यासाठी परत गेला.

सिकंदर रझा आणि कर्टिस कॅम्फरचा वाद –

मात्र हा वाद इथेच मिटला नाही, तर रझा फलंदाजीसाठी वळताच कर्टिस कॅम्फरने रझाला स्लेजिंग करण्यास सुरुवात केली. यावर रझा संतापला आणि त्याने कॅम्फरला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. यानंतर पंचांनी दोघांनाही रोखले आणि एकमेकापासून दूर केले. त्यानंतर रझा परत फलंदाजीसाठी येऊ लागला होता, तेव्हा कॅम्फर पुन्हा काहीतरी बोलला. त्यामुळे सिंकदर रझा भयंकर संतापला मागे वळून आयरिश गोलंदाजाला मारायला धावला. मात्र, अंपायरने पुन्हा एकदा रझाला रोखले. त्यानंतर लेग अंपायरने कॅम्फरला तेथून हटवले आणि प्रकरण शांत केले.

हेही वाचा – IND vs SA : दक्षिण आफ्रिकेविरुदच्या टी-२० मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज! रिंकू सिंगने सांगितला सराव सत्रातला अनुभव

वास्तविक या सामन्यात झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडने २० षटकांत ८ गडी गमावून १४७ धावा केल्या. अँड्र्यू बालबर्नीने सर्वाधिक ३२ धावा केल्या. याशिवाय डेलेनीने २६ धावा, हॅरी टेक्टरने २४ धावा, टकरने २१ धावा आणि कर्णधार पॉल स्टर्लिंगने १४ धावा केल्या. झिम्बाब्वेकडून कर्णधार रझाने सर्वाधिक तीन गडी बाद केले. त्याचबरोबर नगारवा आणि मुजरबानी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. शॉन विल्यम्सला एक विकेट मिळाली.

हेही वाचा – WPL 2024 : स्मृती मंधाना ते ऍशले गार्डनरपर्यंत ‘या’ पाच क्रिकेटपटू आहेत डब्ल्यूपीएलच्या इतिहासातील सर्वात महागड्या खेळाडू

प्रत्युत्तरात झिम्बाब्वेकडून कर्णधार सिकंदर रझाने ६५ धावा केल्या. त्याने ४२ चेंडूत पाच चौकार आणि दोन षटकार मारले. वेसली मधेवरे २५ क्लाइव्ह मदंडेने २० धावांचे योगदान दिले. इतर फलंदाज काही विशेष करु शकले नाही. तरीही झिम्बाब्वेने ९ गडी गमावून १४८ धावा करत विजय नोंदवला. आयर्लंडकडून मार्क अडायर, जोशुआ लिटल, बॅरी मॅककार्थी आणि क्रेग यंग यांनी प्रत्यके दोन गडी बाद केले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Video of the fight between sikandar raza joshua little and curtis campher went viral on social media in zim vs ire match vbm

First published on: 09-12-2023 at 15:02 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×