विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेच्या पात्रता फेरीत प्रशिक्षकांविना सहभागी झालेल्या प्रवीण कुमारने कम्पाऊंड प्रकारात नववे स्थान मिळवले, तर पुरुषांचा संघ पात्रता फेरीत चौथ्या क्रमांकावर राहिला.

प्रवीणने दुसऱ्या फेरीत ७०४ गुणांची कमाई केली. या फेरीत अमेरिकेचा तिरंदाज मॅट सुलिवानने ७१२ गुणांची कमाई करीत अव्वल स्थान पटकावले. प्रवीणच्या सहकाऱ्यांपैकी लोवजोत सिंग आणि गुरविंदर सिंग यांनी संयुक्तपणे २०९१ गुणांची कमाई केली. त्यामुळे भारतीय संघाला १३व्या स्थानावरील न्यूझीलंडच्या संघाशी झुंजावे लागणार आहे.

महिलांच्या गटात परवीनाने २०वा, मोनाली जाधवने २४वा तर प्रिया गुजरने २५वा क्रमांक पटकावला. त्यामुळे भारतीय महिला संघ सहाव्या स्थानावर होता. भारतीय कम्पाऊंड प्रकारातील महिला संघाला आता ११व्या स्थानावरील सिंगापूरशी लढावे लागणार आहे.