भारतीय क्रिकेटपटू मयांक अग्रवालची आगरतळा ते सूरतच्या विमान प्रवासात प्रकृती बिघडली आहे. मयांक अग्रवाल हा कर्नाटक रणजी संघाचा कर्णधार असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. टाईम्स नाऊने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

विमान प्रवासादरम्यान मयांक अग्रवाल बाटलीबंद पेय प्यायला होता. त्यानंतरच, त्याला घशाचा त्रास जाणवू लागला. या बाटलीबंद पेयात विषारी पदार्थ असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. अग्रवाल सध्या आगरतळा येथील आयएलएस रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये आहेत. दरम्यान, त्याची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येतंय. मयांक अग्रवाल सध्या रुग्णालयात डॉक्टरांच्या निगराणीखाली आहे, असं मयांकची पत्नी आशिता हिने सांगितलं.

ola uber pune ban marathi news
पुण्यात ओला, उबर सुरू राहणार? जाणून घ्या अंतिम निर्णय कधी होणार…
pune airport marathi news, pune airport no facility marathi news,
पुणेकरांचा हवाई प्रवास ठरतोय ‘वाऱ्यावरची वरात’!
Theft in mall in Pune gang from Rajasthan was arrested
विमानाने येऊन पुण्यातील मॉलमध्ये चोरी… राजस्थानातील टोळी गजाआड
pilots missing What happened to Vistara
३८ हून अधिक उड्डाणे रद्द, तासभराचा उशीर, वैमानिक गायब; ‘विस्तारा’चं काय बिनसलं?

मयांक अग्रवालला त्रास जाणवू लागल्याने आगरतळा ते दिल्लीला जाणारे इंडिगो फ्लाईट 6E 5177 हे विमान पुन्हा आगरतळा येथे उतरवण्यात आले. तिथून त्याला रुग्णालयात नेण्यात आले, असं इंडिगो या विमानसेवा कंपनीने त्यांच्या निवेदनात म्हटलं आहे.

२६ ते २९ जानेवारी दरम्यान आरतळा येथील महाराज वीर विक्रम स्टेडिअमवर रणजी क्रिकेट स्पर्धा पार पडली. यामध्ये कर्नाटक संघाचं नेतृत्त्व त्याने केलं. २९ धावांनी त्याने त्रिपुरावर विजय मिळवला. तर, रणजी स्पर्धेत कर्नाटकची पुढची स्पर्धा २ फेब्रुवारी रोजी रेल्वेविरोधात सूरतला होणार आहे.

२०१८ मध्ये पदार्पण केल्यापासून मयंकने एकूण २१ कसोटी सामने खेळले आहेत. त्याने २१ सामन्यांमध्ये १४८८ धावा केल्या आहेत. मार्च २०२२ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात तो भारताकडून खेळला होता. अग्रवालने त्याच्या कारकिर्दीत राष्ट्रीय संघासाठी पाच एकदिवसीय सामनेही खेळले आहेत. २०२४ च्या आयपीएलमध्ये मयंक अग्रवाल सनरायझर्स हैदराबादकडून खेळणार आहे. तो २०२२ मध्ये पंजाब किंग्सच्या बाजूने खेळला होता.