रेयाल माद्रिद संघाच्या प्रशिक्षकपदी सान्तियागो सोलारी यांची २०२१ मोसमापर्यंत निवड करण्यात आली आहे.

रेयाल माद्रिदच्या संचालकांनी सोलारी यांच्या नावाची घोषणा करून ३० जून २०२१ पर्यंतच्या कालावधीसाठी ही नियुक्ती असल्याचे जाहीर केले. सात सामन्यांमध्ये केवळ एकच विजय मिळवून देऊ शकलेल्या जुलेन लोपेतेगुई यांच्या जागी सोलारी यांची २९ ऑक्टोबरलाच तात्पुरती नियुक्ती करण्यात आली होती. बार्सिलोनाकडून ५-१ असा लाजिरवाणा पराभव पत्करावा लागल्यानंतर लोपेतेगुई यांच्या गच्छंतीचे संकेत मिळाले होते.