वय-  ३६

स्पर्धा :
टेनिस (पुरूष दुहेरी)

स्पर्धेची तारीख: ६ ऑगस्ट

Prakash Javadekar believes that the BJP will win more than five seats in a three way contest in Kerala
केरळमध्ये तिरंगी लढतीत भाजप पाच पेक्षा जास्त जागा जिंकणार- जावडेकर
gukesh d creates history becomes youngest Player to win fide candidates title zws
गुकेशला ऐतिहासिक जेतेपद; नामांकितांना मागे सोडत ‘कँडिडेट्स’मध्ये अजिंक्य; जगज्जेतेपदाच्या लढतीसाठी पात्र
Jalal Yunus Says Mustafizur Rahman has nothing to learn in IPL
‘IPLमध्ये शिकण्यासारखे काहीच नाही…,’ मुस्तफिझूरला परत बोलावल्यानंतर BCB अध्यक्षांचे चकित करणारे वक्तव्य
BJP, Jats, Thakurs, anger of the Jats ,
पहिल्या टप्प्यामध्ये भाजपला जाट, ठाकुरांच्या रागाची धास्ती

पात्रता फेरी: रोहण बोपण्णाने ६ जून रोजी एटीपी मानांकनात पहिल्या दहा क्रमांकांमध्ये स्थान मिळवत रिओ ऑलिम्पिकसाठी प्रवेशिका निश्चित केली.

विक्रम: रोहनने याआधी केवळ एकदाच ऑलिम्पिकमध्ये (२०१२) सहभाग घेता आला होता. मात्र, त्यावेळी रोहनच्या हाती अपयश आले होते. यावेळी त्याच्याकडून पदकाची अपेक्षा आहे.

सर्वोत्तम कामगिरी: २०१५ साली झालेल्या माद्रिद मास्टर्स १००० स्पर्धेचा विजेता. वर्ल्ड टूर (२०१५) स्पर्धेचा उप-विजेता.

पुरुष दुहेरीत बोपण्णाला ऑलिम्पिकसाठी जोडीदार म्हणून पेसबरोबरच पुरव राजा (१०३), दिविज शरण (११४), साकेत मायनेनी (१२५), जीवन नेदुंचेझियन (१३४) व महेश भूपती (१६४) यांच्यापैकी एकाची निवड करावी लागणार आहे. गेल्या सहा वर्षांत पहिल्या २० खेळाडूंच्या यादीत रोहनने तब्बल पाच वेळा आपले स्थान कायम राखले आहे. २०१५ सालच्या आकडेवारीत रोहनला पहिल्या दहा जणांमध्ये स्थान मिळवता आले. रोहन बोपण्णा मिश्र दुहेरी गटातील उत्तम टेनिसपटू म्हणून ओळखला जातो. महेश भूपतीच्या वडीलांच्या मार्गदर्शनाखाली रोहन सराव करत होता. आता ‘फिजिओ’सह त्याचे व्यवस्थापन पाहणारे पथक त्याच्यासोबत असते. रोहनकडून यंदा ऑलिम्पिक पकदाची अपेक्षा आहे.