Pant & Ponting remark on Kuldeep Yadav: २०२३ वर्षातील भारतासाठी सर्वात मोठी सकारात्मक बाब म्हणजे कुलदीप यादवचे संघातील पुनरागमन. कुलदीपने टीम इंडियात पुनरागमन केल्यापासून गेल्या १२ महिन्यांत, २५ सामन्यांमध्ये ४८ विकेट्स घेतल्या आहेत. त्यापैकी ८ विकेट्स बांगलादेशविरुद्धच्या एका कसोटी सामन्यात घेतल्या होत्या. तसेच १८ एकदिवसीय सामन्यांमध्ये २०च्या सरासरीने आणि ४.८२च्या इकॉनॉमी रेटने एकूण ३२ विकेट्स घेतल्या आहेत. मागच्या ६ टी२० सामन्यांमध्ये त्याने ५.८५च्या इकॉनॉमी रेटने ८ विकेट्स घेतल्या होत्या. थोडक्यात, कुलदीप यादव हा गेल्या १२ महिन्यांत भारताचा सर्वात प्रभावी फिरकी गोलंदाज ठरला आहे.

कुलदीपने फ्लोरिडातील लॉडरहिल येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या टी२० सामन्यात हाच फॉर्म कायम ठेवला. कर्णधार हार्दिक पांड्याने सहाव्या षटकात डावखुऱ्या फिरकीपटूकडे चेंडू सोपवला आणि त्याचा झटपट परिणाम म्हणजे त्याने टीम इंडियाला विकेट्स काढून दिल्या. कुलदीपने त्याच्या षटकात निकोलस पूरन आणि वेस्ट इंडिजचा कर्णधार रोव्हमन पॉवेलला बाद करून यजमानाना मोठा धक्का दिला. पूरनने या मालिकेत भारतीय गोलंदाजांविरुद्ध भरपूर धावा कुटल्या होत्या, परंतु कुलदीपने त्याची विकेट घेत टीम इंडियाला मोठे यश मिळवून दिले. पूरनने कुलदीपच्या चेंडूवर लाँग ऑनला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला पण सूर्यकुमार यादवने एक सोपा झेल घेत त्याला तंबूचा रस्ता दाखवला.

Tristan Stubbs fielding video viral in DC vs GT Match
DC vs GT : ट्रिस्टन स्टब्सच्या सीमारेषेवरील शानदार फिल्डिंगने सामन्याला दिली कलाटणी, VIDEO व्हायरल
Yashasvi Jaiswal is the first player to score two centuries in IPL before turning 23
IPL 2024: यशस्वीने एकाच शतकासह रचला इतिहास, आयपीएलमध्ये ही कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज
IPL 2024 Chennai Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर सॅम करनने केली रिव्ह्यूची मागणी, करनच्या चतुराईमुळे असा बाद झाला राहुल त्रिपाठी; पाहा VIDEO
Rohit sharma speech in Mumbai Indians Dressing Room Video MI vs DC
IPL 2024: ‘वैयक्तिक कामगिरी, विक्रम फारसे महत्त्वाचे नाहीत…’, रोहित शर्माने मुंबईच्या विजयानंतर ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंशी साधला संवाद

कुलदीपने वेस्ट इंडिजचा कर्णधार रोव्हमन पॉवेलसाठी आपला सर्वोत्तम चेंडू टाकला, ज्यावर त्याने ऑन-साईडला मारण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू स्पिन झाला आणि बॅटची बाहेरील बाजू घेत पहिल्या स्लिपमध्ये गेला. शुबमन गिलने कोणतीही चूक न करता शानदार झेल घेतला. त्यामुळे वेस्ट इंडिज अचानक ४ बाद ५७ धावा अशा अवघड परिस्थितीत सापडले, त्यांनी आठ चेंडूत तीन विकेट्स गमावल्या. मात्र, शिमरॉन हेटमायरने एक बाजू सांभाळून धरत विंडीजचा डाव पुन्हा रुळावर आणला. त्याने ६१ धावांची दमदार अर्धशतकी खेळी केली.

हेही वाचा: Rohit Sharma: आशिया चषक आणि विश्वचषकासाठी रोहित शर्माचं साकडं, पोहचला दक्षिणेतील एका खास मंदिरात, पाहा Video

डाव्या हाताचा रिस्ट स्पिनर कुलदीप यादवची ही पुनरागमनाची कहाणी म्हणजे त्याच्या धैर्याची आणि निर्धाराची आहे, असे म्हटले तर वावगं ठरणार नाही. २०१९च्या विश्वचषकानंतर त्याच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली होती. त्याने त्याचे भारतीय संघातील स्थान गमावले आणि अंतिम १५ मध्ये जरी त्याचा समावेश असला तरी क्वचितच त्याला प्लेइंग ११ मध्ये संधी दिली जात होती. आयपीएल फ्रँचायझी कोलकाता नाइट रायडर्सनेही त्याच्यावरील विश्वास गमावला आणि संघातून त्याला बाहेरचा रस्ता दाखवला होता. कुलदीपला २०२१मध्ये गुडघ्याला दुखापत झाली होती, ज्यामुळे केकेआरने कुलदीपला सोडण्यास प्रवृत्त केले.

प्रत्यक्षात मात्र तो त्याच्या कारकिर्दीतील टर्निंग पॉइंट ठरला. त्याला दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतले जेथे त्याला मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग आणि कर्णधार ऋषभ पंत यांचा पाठिंबा मिळाला ज्याची त्याला नितांत गरज होती. कुलदीपचे बालपणीचे प्रशिक्षक कपिल पांडे इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना म्हणाले, “रिकी पाँटिंगने त्याला सांगितले, ‘मी तुला सर्व सामने खेळवणार आहे. या मागचे मुख्य कारण म्हणजे वॉर्नी (शेन वॉर्न) आहे आणि मी हे पाहू शकतो की तू आमचा शेन वॉर्न सारखाच मॅचविनर आहेस. एकप्रकारे त्याने त्याची तुलना महान शेन वॉर्नशी केली.”

हेही वाचा: IND vs WI: “यापेक्षा चांगली खेळपट्टी तुम्हाला मिळणार नाही पण…”; माजी खेळाडूने शुबमन, यशस्वी दिला सल्ला

कुलदीपला वरिष्ठ खेळाडू म्हणून मानणाऱ्या पंतने या फिरकीपटूला प्रत्येक सामन्यात खेळवण्याचे आश्वासन दिल्याचे त्याला सांगितले. “ऋषभने त्याला ‘आपको अच्छा करना होगा भैया, आपसे बडा बॉलर नहीं है इंडिया में’ (तुम्हाला चांगले प्रदर्शन करावे लागेल, भारतात तुमच्यापेक्षा चांगला गोलंदाज कोणीही नाही).” कुलदीप हा पट्टीचा गोलंदाज होता. त्याच्यात पुरेपूर आत्मविश्वास भरलेला आहे. आयपीएल २०२२मध्ये त्याने २१ विकेट्स घेतल्या आणि त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही.