Rohit Sharma’s Played 150th T20I Matches : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा रोज नवनवे विक्रम रचत आहे. इंदूरच्या होळकर स्टेडियमवर रविवारी अफगाणिस्तानविरुद्धचा दुसरा टी-२० सामना खेळण्यासाठी तो आला होता. यादरम्यान रोहितने मैदानात पाऊल ठेवताच इतिहास रचला. त्याने आपल्या कारकिर्दीत आणखी एका विक्रमाची भर घातली आहे. रोहित शर्माने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात एक असा विक्रम केला आहे, जो या अगोदर कोणत्याही खेळाडूला करताला नाही.

रोहित शर्माने रचला इतिहास –

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात १५० सामने खेळणारा रोहित शर्मा हा जगातील पहिला पुरुष क्रिकेटपटू ठरला आहे. आतापर्यंत कोणत्याही क्रिकेटपटूला हे स्थान मिळवता आले नाही. अशा परिस्थितीत रोहितने टी-२० क्रिकेटमध्ये इतिहास रचला. रोहितच्या कारकिर्दीतील नवीन कामगिरी पाहून त्याचे चाहते आनंदी झाले. या विक्रमासाठी कर्णधारावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे.

indian football team defeated by qatar
पंचांच्या चुकीचा फटका! विश्वचषक पात्रतेपासून भारतीय फुटबॉल संघ दूरच; कतारकडून पराभूत
Rohit is the first player to play most T20 World Cup
T20 WC 2024 : रोहित शर्माचा ‘वर्ल्ड रेकॉर्ड’! आजपर्यंत जगातील कोणत्याच खेळाडूला न जमलेला केला पराक्रम
Rohit Sharma Becomes the First Batsman to hit 600 Sixes in International Cricket
T20 WC 2024: रोहित शर्माच्या नावे वर्ल्ड रेकॉर्ड, ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिलाच फलंदाज
Rohit Sharma breaks Dhoni's record
IND vs IRE : रोहित शर्माने धोनीला मागे टाकत रचला इतिहास! ‘हा’ मोठा पराक्रम करणारा ठरला पहिलाच कर्णधार
Sanjay Manjrekar vote for Hardik Pandya
T20 WC 2024 : “हार्दिक पंड्या पाचवा गोलंदाज असू शकत नाही, कारण…”, संजय मांजरेकरने रोहितच्या टीमला दिला इशारा
america played first international cricket match before 180 years
१८० वर्षांपूर्वी अमेरिका खेळली होती पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना! आता वर्ल्डकपमुळे क्रिकेट तेथे पुन्हा लोकप्रिय होईल?
Harmeet Singh India U19 Cricketer to USA Cricket Team Player Journey
T20 WC 2024: हरमीत सिंह; रोहित शर्माचा मित्र, फिक्सिंगचा आरोप आणि ढवळून निघालेली कारकीर्द
Virat's reaction to Dinesh Karthik
दिनेश कार्तिकच्या निवृत्तीनंतर पत्नी दीपिका पल्लिकल भावुक; म्हणाली, “मी जर त्याच्या जागी असते तर…”

विराट कोहली दहाव्या स्थानावर –

रोहितनंतर टी-२० क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक सामने खेळण्याच्या बाबतीत आयरिश फलंदाज पॉल स्टर्लिंगचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. पॉलने १३४ सामने खेळले आहेत. त्याच्यानंतर आयरिश खेळाडू जॉर्ज डॉकरेल आहे. जॉर्जने १२८ सामने खेळले आहेत.त्याचबरोबर पाकिस्तानचा फलंदाज शोएब मलिक चौथ्या स्थानावर आहे. शोएबने १२४ सामने खेळले आहेत. न्यूझीलंडचा खेळाडू मार्टिन गप्टिल पाचव्या क्रमांकावर आहे. गप्टिलने १२२ सामने खेळले आहेत. विराट कोहलीबद्दल बोलायचे झाले तर तो या यादीत १०व्या स्थानावर आहे. कोहली आपला ११६ वा सामना खेळत आहे.

हेही वाचा – VIDEO : विराटचे जोकोविचशी पहिल्यांदा कसे झाले होते संभाषण? स्वत: किंग कोहलीने सांगितला किस्सा

भारताची हरमनप्रीत कौर या यादीत अव्वल –

जर महिला क्रिकेटबद्दल बोलायचे, तर टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरचे नाव सर्वात वर आहे. हरमनने १६१ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. न्यूझीलंडची सुझी बेट्स दुसऱ्या स्थानावर आहे. बेट्सने १५२ सामने खेळले आहेत. इंग्लंडची डॅनियल व्याट १५१ सामन्यांसह तिसऱ्या स्थानावर आहे आणि ऑस्ट्रेलियाची एलिस पेरी १५० सामन्यांसह चौथ्या स्थानावर आहे.

हेही वाचा – Yuvraj Singh : ‘तो मला माझी आठवण करून देतो…’, युवराजला भारताच्या ‘या’ खेळाडूमध्ये दिसते स्वतःची झलक

रोहित सर्वाधिक धावा करणारा जगातील दुसरा क्रिकेटपटू –

रोहितच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करणारा तो जगातील दुसरा खेळाडू आहे. रोहितने आतापर्यंत १४९ सामन्यात ३८५३ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये ४ शतके आणि २९ अर्धशतकांचा समावेश आहे. या यादीत विराट कोहलीचे नाव आघाडीवर आहे. ज्याने ११५ सामन्यात ४००८ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये एक शतक आणि २७ अर्धशतकांचा समावेश आहे.